---Advertisement---

सनथ जयसूर्यासाठी वाढदिवस आहे खास, ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवलाय अव्वल क्रमांक

On: गुरूवार, जून 30, 2022 8:15 AM
---Advertisement---

वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या आयुष्यातील खास दिवस असतो. त्यादिवशी काहीतरी विशेष करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यातही जर एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीत त्याच्या वाढदिवसाला एखादा मोठा विक्रम त्याच्या नावावर झाला असेल तर ‘सोन्याहून पिवळं’. असाच एक विक्रम श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या (Sanath jayasuriya) याच्या बाबतीत झालं आहे. जयसुर्याचा आज (३० जून) ५३वा वाढदिवस आहे. त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याच्या नावावर असलेल्या एका खास विक्रमावर नजर टाकू.

सनथ जयसुर्यासाठी वाढदिवस खास
वनडे क्रिकेटमध्ये वाढदिवसाच्या दिवशी सर्वाधिक धावा करण्याचा अनोखा विक्रम हा जयसुर्याच्या नावावार आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत २ वनडे सामने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी खेळले. या २ सामन्यांत मिळून त्याने १६६ धावा केल्या आहेत.

त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पहिला वनडे सामना २००२ साली भारताविरुद्ध द ओव्हलवर खेळला होता. त्या सामन्यात त्याने ३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर २००८ साली त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेशविरुद्ध कराची येथे सामना खेळला. त्या सामन्यात त्याने शतकी खेळी करताना १३० धावा केल्या होत्या.

वाढदिवसाच्या दिवशी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जयसुर्या पाठोपाठ डॅरेन ब्रावो आहे. त्याने १६५ धावा केल्या आहेत. तर त्यानंतर रॉस टेलर (१६२), डॅमिएन मार्टिन (१३५) आणि सचिन तेंडुलकर (१३४) यांचा क्रमांक लागतो.

सनथ जयसुर्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द 
जयसुर्याने ४४५ वनडे सामने खेळले ज्यात २८ शतकांचा समावेश आहे. त्याने १३४३० धावा केल्या आहेत. याचसोबत त्याने ३२३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर कसोटीमध्ये त्याने ११० सामने खेळताना १४ शतकांसह ६३७३ धावा केल्या आहेत आणि ९८ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ३१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने देखील खेळले असून यात ६२८ धावा आणि १९ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. श्रीलंकेला १९९६ चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची जबाबदारी त्याने पार पाडली होती.

त्यानी २०११ ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्यानी राजकारणात प्रवेश केला. तसेच २०१३ मध्ये तो श्रीलंकेच्या निवड समितीचे अध्यक्ष झाला होता. मात्र २०१५ मध्ये श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांना हे अध्यक्षपद सोडावे लागले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

वाढदिवस विशेष: एका रात्रीत जयसूर्याला सलामीवीर बनवण्याचा निर्णय झाला अन् पुढे इतिहास घडला

ठरलंय! भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये आता हार्दिक पंड्याच कॅप्टन, खुद्द बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेच केले स्पष्ट

पहिल्या सामन्यात महागडा ठरला, तरीही उमरानकडे का दिले विसावे षटक? कर्णधार हार्दिकचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---