---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध वनडेत सर्वाधिक पराभव पाहणारे ५ भारतीय कर्णधार

On: मंगळवार, जून 2, 2020 8:02 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यांची चाहते कायम वाट पाहत असतात. पुर्वी भारत पाकिस्तानमधील संबंध चांगले असताना भारत पाकिस्तान दौऱ्यावर किंवा पाकिस्तान भारत दौऱ्यावर येत असे.

अशावेळी ज्या देशात सामना असेल त्या देशातील स्टेडियम पुर्णपणे भरुन जात असतं. आज या दोन देशांत द्विपक्षीय मालिका पुर्णपणे बंद आहेत. हे दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धा किंवा आशिया कप स्पर्धेत समोरासमोर आले तरच सामने खेळतात.

कसोटी क्रिकेटचा इतिहास

कसोटी क्रिकेट सामने १९५२ पासून या दोन देशांत २००७ पर्यंत ५९ सामने झाले. यातील भारतीय संघ ९ सामने जिंकला तर १२ कसोटी सामने पराभूत झाला. तब्बल ३८ सामने अनिर्णित राहिले. यावरुन या दोन संघातील चुरस दिसून येते. परंतु दोन देशातील खराब संबंधांमुळे २००७ पासून एकही कसोटी सामना या दोन देशांत झाला नाही.

वनडे क्रिकेटचा इतिहास 

भारत पाकिस्तान देशांत आजपर्यंत १३२ वनडे सामने झाले असून भारताने ५५ तर पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत. ४ सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. असे असले तरी आयसीसी विश्वचषकात मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला एकही विजय मिळवू दिला नाही.

कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध वनडेतील भारतीय कर्णधारांचे विक्रम

कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध वनडेत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम भारताकडून मोहम्मद अझरुद्दीनने केला आहे. १९९० ते १९९९ या काळात त्याने तब्बल २५ सामन्यात पाकिस्तानविरुद्ध संघाचे नेतृत्त्व केले.

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने जिंकण्याचा पराक्रम भारताकडून कर्णधार म्हणून एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने १८ सामन्यात तब्बल ११ विजय मिळवले आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताकडून वनडेत सर्वाधिक पराभव पहावे लागलेला कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आहे. अझरने २५ सामन्यात तब्बल १६ पराभव पाहिले आहे.

सचिनने पाकिस्तानविरुद्ध बॅटने अतिशय चांगली कामगिरी केली असली तरी कर्णधार म्हणून सचिनची कामगिरी या संघाविरुद्ध तशी खराबच राहिली. सचिनने पाकिस्तानविरुद्ध २१ वनडे सामन्यांत तब्बल ११ पराभव पाहिले आहेत.

रोहित शर्मा (२) व मोहिंदर अमरनाथ (१) यांनी पाकिस्तानविरुद्ध कर्णधार म्हणून खेळलेल्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवला आहे.

कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक पराभव पाहणारे खेळाडू

मोहम्मद अझरुद्दीन, एकूण वनडे सामने- २५, पराभव- १६, विजय- ९

सचिन तेंडूलकर, एकूण वनडे सामने- २१, पराभव- ११, विजय- ८

सौरव गांगुली, एकूण वनडे सामने- १७, पराभव- १०, विजय- ७

कपिल देव, एकूण वनडे सामने- १३, पराभव- ९, विजय- ४

एमएस धोनी, एकूण वनडे सामने- १८, पराभव- ७, विजय- ११

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---