इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. अशात उद्घाटनाच्या सामन्यातच एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत हंगामाची दणक्यात सुरुवात केली होती. पण त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेन्नई संघाचा या हंगामातील चौथा सामना झाला.
या सामन्याद्वारे दुखापतीतून सावरलेले अंबाती रायडू आणि ड्वेन ब्रावो यांनी पुनरागमन केले. या २ खेळाडूंच्या आगमनामुळे चेन्नई संघात एक अनोखा बदल पाहायला मिळाला.
तसं तर आपणा सर्वांना माहिती आहे की, चेन्नई संघात वयस्कर खेळाडूंचा भरणा आहे आणि ही गोष्ट हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ठळकपणे दिसून आली. म्हणजे चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंपैकी तब्बल ८ खेळाडूंचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त होते. यात शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, केदार जाधव, धोनी, ब्रावो, पियूष चावला आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे.
त्यातही चावला आणि जडेजा यांचे वय सर्वात कमी आहे. ते दोघेही ३१ वर्षांचे आहेत. या दोघांव्यतिरिक्त उर्वरित ६ खेळाडू हे ३५ किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचे आहेत. चेन्नईचा सलामीवीर फलंदाज वॉटसन आणि यष्टीरक्षक धोनीचे वय सर्वात जास्त आहे. ते दोघेही ३९ वर्षांचे आहेत. तर ब्रावो ३७ वर्षांचा आणि फाफ डू प्लेसिस ३६ वर्षांचा आहे. तसेच रायडू आणि जाधव हे ३५ वर्षांचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे पठ्ठ्या! पुनरागमन करताच ब्राव्होने केला ‘हा’ कारनामा; ठरला चौथा परदेशी खेळाडू
रायडूची चपळाई आणि धोनीचा धुर्तपणा असल्यावर ‘रनआऊट’ तर फिक्स ना भाऊ! पाहा व्हिडिओ
सुपरमॅनचा सुपर कॅच! डुप्लेसीने घेतलेला झेल पाहून हैदराबादचं डगआऊटही झालं वेडं
ट्रेंडिंग लेख-
‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार
‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड