एडलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (१५ जानेवारी ) दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. त्याने या सामन्यात १०८ चेंडूत १०० धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
याबरोबर परदेशात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानी आला आहे. विराटने वनडेतील ३९ पैकी २२ शतके परदेशात केली आहेत.
परदेशात वनडे सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे.
सचिनने परदेशात वनडेत २९ शतके केली आहेत तर तिसऱ्या स्थानावर २१ शतकांसह कुमार संगकारा आणि सनथ जयसुर्या आहेत.
परदेशात वनडेत सर्वाधिक शतके करणारे खेळाडू-
२९- सचिन तेंडूलकर
२२- विराट कोहली
२१- सनथ जयसुर्या
२१- कुमार संगकारा
महत्त्वाच्या बातम्या –
–जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ
–एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास
–मोहम्मद सिराजचे झाले टीम इंडियाकडून वनडे पदार्पण