मँचेस्टर। 2019 विश्वचषकात गुरुवारी(27 जून) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानानवर भारत विरुद्ध विंडीज संघात पार पडलेल्या 34 व्या सामन्यात भारताने 125 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघ आता केवळ एक पाऊल दूर आहे.
भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने 82 चेंडूत 72 धावांची खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या या महत्त्पूर्ण खेळीसाठी त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला आहे.
विराटचा हा वनडे क्रिकेटमधील 33 वा सामनावीर पुरस्कार ठरला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याने हा विक्रम करताना जॅक कॅलिस, रिकी पाँटींग आणि शाहीद आफ्रिदी या दिग्गज माजी क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. या तिघांनीही 32 वेळा वनडेमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे.
या यादीत 62 सामनावीर पुरस्कारांसह अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सनथ जयसुर्या आहे. त्याने 48 वेळा वनडेमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.
गुरुवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 268 धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीबरोबरच एमएस धोनीने नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच विंडीजकडून गोलंदाजीत केमार रोचने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
त्यानंतर भारताने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 34.2 षटकात सर्वबाद 143 धावाच करता आल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
वनडेत सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू-
62- सचिन तेंडूलकर
48- सनथ जयसुर्या
33- विराट कोहली
32- जॅक कॅलिस, रिकी पाॅटींग, शाहीद आफ्रिदी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मोहम्मद शमीने केला नवा विश्वविक्रम; स्टार्क, बोल्टसारख्या गोलंदाजांनाही टाकले मागे
–आयसीसीने श्रीलंकेला दिली ‘ही’ लकी जर्सी घालण्याची परवानगी, जाणून घ्या कारण
–विंडीज विरुद्धच्या विजयानंतरही सेहवागने केली भारतीय फलंदाजांवर टीका, जाणून घ्या कारण