---Advertisement---

म्हणून एक महान सलामीवीराच्या रुपात रोहितचं नाव सचिन-सेहवागबरोबर घ्यावचं लागेल

On: शुक्रवार, एप्रिल 30, 2021 8:46 AM
---Advertisement---

भारतीय वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण केले होते. पण पुढे जाऊन त्याने सलामीवीर म्हणून भारतीय संघातील स्थान पक्के करताना अनेक विक्रम केले.

त्याने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मर्यादीत षटकांच्या भारतीय संघात नियमित सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली होती. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३३ सामन्यात सलामीला खेळताना ४९.६३ च्या सरासरीने १०६७२ धावा केल्या आहेत.

तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीर फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच सलामीवीर म्हणून १० हजार धावांचा टप्पा पार करणारा तो केवळ चौथा भारतीय आहे. याआधी विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर या भारतीय सलामीवीर फलंदाजांनाच असा कारनामा करता आला आहे.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीर फलंदाजांच्या यादीत पहिल्या २० जणांमध्ये असणाऱ्या खेळाडूंपैकी रोहितची सर्वाधिक सरासरी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीर फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे. सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३२ सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी करताना ४१.५४ च्या सरासरीने १६११९ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर – 
१६११९ धावा – विरेंद्र सेहवाग (३२१ सामने)
१५३३५ धावा – सचिन तेंडुलकर (३४६ सामने)
१२२५८ धावा – सुनील गावस्कर (२०२ सामने)
१०६७२ धावा – रोहित शर्मा (२३३ सामने)
९९६५ धावा – शिखर धवन (२४० सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---