Loading...

अखेर कर्णधार कोहलीने ‘कॅप्टनकूल’ धोनीचा सर्वात मोठा विक्रम मोडलाच!

बंगळुरु। रविवारी(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिका 2-1 ने जिंकली. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी एक मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात विराटने 91 चेंडूत 8 चौकारांसह 89 धावा केल्या. याबरोबरच त्याच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 172 सामन्यात 66.71 च्या सरासरीने 11208 धावा झाल्या आहेत.

त्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने कर्णधार म्हणून 332 आंतरराष्ट्रीय सामन्यात 46.89 च्या सरासरीने 11207 धावा केल्या आहेत.

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण कर्णधारांच्या यादीतही विराट आता धोनीला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-

Loading...

15440 धावा – रिकी पाँटिंग

14878 धावा – ग्रॅमी स्मिथ

11561 धावा – स्टीफन फ्लेमिंग

11208 धावा – विराट कोहली

Loading...

11207 धावा – एमएस धोनी

11062 धावा- ऍलन बॉर्डर

#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार – 

11208 धावा – विराट कोहली

Loading...

11207 धावा – एमएस धोनी

8095 धावा – मोहम्मद अझरुद्दीन

7665 धावा – सौरव गांगुली

Loading...
You might also like
Loading...