ऑस्ट्रेलियामध्ये पुरूष क्रिकेट संघाचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जात आहे. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून पाकिस्तानने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. गुरूवारी (10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा-जेव्हा विराट कोहली फलंदाजी करतो, तेव्हा-तेव्हा त्याच्या प्रत्येक खेळीवर एखादा विक्रम होतोच. या सामन्यातही विराटने 11 वी धाव घेताच टी20 विश्वचषकातील बलाढ्य विक्रम आपल्या नावावर केला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (KL Rahul) याची विकेट लवकर गमावली. तो 5 चेंडूमध्ये 5 धावा करत क्रिस वोक्स याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजी करण्यास आला. त्याने या सामन्यात 11वी धाव घेताच टी20 विश्वचषकात नॉन-ओपनर्स अर्थातच सलामीला न येता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने अशी कामगिरी तीन विश्वचषकांमध्ये केली आहे. Most runs by non-openers in a Men’s T20 World Cup
विराटने 2014 च्या हंगामात 319, 2016च्या हंगामात 273 आणि 2022च्या हंगामात 274* धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर इंग्लंडच्या जो रूट (Joe Root) आणि केविन पीटरसन (Kevin Pieterson) यांचा क्रमांक लागतो. रूटने 2016मध्ये 249 धावा आणि पीटरसनने 2010मध्ये 248 धावा केल्या होत्या.
विराटने आधीच टी20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक अर्धशतके आणि सर्वाधिक सरासरी हे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले असता, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा 28 चेंडूत 27 धावा करत बाद झाला. तसेच सूर्यकुमार यादव हा पण 9 चेंडूत 14 धावा करत बाद झाला तर विराट खेळपट्टीवर उपस्थित आहे.
पुरुषांच्या टी20 विश्वचषकामध्ये सलामीला न येता सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
319 – विराट कोहली (2014)
274* – विराट कोहली (2022)
273 – विराट कोहली (2016)
249 – जो रूट (2016)
248 – केवीन पीटरसन (2010)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात नुसता फ्लॉप ठरलाय केएल राहुल, कामगिरी पाहून तळपायाची आग जाईल मस्तकात
VIDEO: पाकिस्तान जिंकल्याने शोएब मलिक-वकार युनूसने स्टुडिओतच धरला ठेका, व्हिडिओ होतोयं व्हायरल