काल आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशवर सफाईदार विजय मिळविला. त्यात विराट कोहली, युवराज सिंग आणि अन्य खेळाडूंनी काही विश्वविक्रम आपल्या नावावर केले. परंतु त्याचबरोबर भारतीय संघानेही एक मोठा विक्रम केला आहे . असा विक्रम ज्यात भारतापुढे फक्त एक देश आहे जो ऑस्ट्रेलिया.
तो विक्रम म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत मिळून भारतीय संघाने केल्या आहेत तब्बल २, ००, ००० धावा. भारतापेक्षा जास्त धावा फक्त ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर असून त्या आहेत २,०१,०००.
भारतीय संघ आपला पहिला एकदिवसीय सामना खेळाला होता २३ जुलै १९७४ साली. विशेष म्हणजे हाही सामना इंग्लंड देशातच भारत खेळला होता. त्यात भारताकडून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिली धाव माजी कर्णधार आणि महान खेळाडू सुनील गावसकर यांनी घेतली होती. त्यानंतर आजपर्यंत भारत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९११ सामने खेळला असून तोही एक विक्रम भारताच्या नावावर आहे.
या २ लाख धावांमधील तब्बल ४०४१५ धावा या सचिन, द्रविड आणि गांगुलीने मिळून केल्या आहेत. म्हणजेच त्यांचा भारताच्या एकूण धावांमधील वाटा आहे तो २०.२०%
भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाने १० सामने कमी खेळून १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सार्वधिक धावा करणारे संघ
धावा- २,०१,०००+, संघ- ऑस्ट्रेलिया, सामने- ९०१
धावा- २,००,०००+, संघ- भारत, सामने- ९११
धावा- २,००,०००+, संघ- भारत, सामने- ९११
धावा- १,८९,०००+, संघ- पाकिस्तान, सामने- ८७८
धावा- १,६८,०००+, संघ- श्रीलंका, सामने- ७९३
धावा- १,५६,०००+, संघ- वेस्ट इंडिज, सामने- ७५७
धावा- १,५१,०००+, संघ- न्युझीलँड, सामने- ७२८
धावा- १,४९,०००+, संघ- इंग्लंड, सामने- ६९२