नाॅटिंगहॅम | बुधवारी इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया तिसऱ्या वनडेत इंग्लंडने वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी ५० षटकांत ६ बाद ४८१ धावा केल्या.
ही वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापुर्वी ३० आॅगस्ट २०१६मध्ये याच संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध ५० षटाकांत ३ बाद ४४४ धावा केल्या होत्या.
आॅस्ट्रेलियाला २३९ धावांवर रोखत इंग्लंड संघाने २४२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात एक खास विक्रम झाला.
इंग्लंडचा कर्णधार ईऑन माॅर्गनने इंग्लंडसाठी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने इंग्लंडकडून खेळताना १८० सामन्यात ५४४३ धावा केल्या आहेत.
३७.७९च्या सरासरीने ह्या धावा करताना त्याने १० शतके आणि ३२ अर्धशतके केली आहेत.
विशेष म्हणजे हा खेळाडू २००६ ते २००९ या काळात आय़र्लंडकडून २३ सामने खेळला असुन त्यात त्याने ७४४ धावा केल्या आहेत.
यापुर्वी वनडेत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महान फलंदाज इयान बेलच्या नावावर होता. त्याने १६१ सामन्यात ५४१६ धावा केल्या आहेत.
इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
५४४३- ईऑन माॅर्गन, सामने- १८०
५४१६- इयान बेल, सामने- १६१
५०९२- पाॅल काॅलिंगवूड, सामने- १९७