भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे न्यूझीलंडने भारतीय संघाला 21 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासोबतच त्यांनी मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. असे असले, तरीही भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. सूर्याने भारतीय संघाच्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 176 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेट्स गमावत 155 धावांवरच समाधाना मानावे लागले. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 21 धावांनी खिशात घातला.
भारताकडून यावेळी फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने दुसरी सर्वोच्च धावसंख्या रचली. वॉशिंग्टन सुंदर (50 धावा) याच्याशिवाय सूर्याने भारताच्या धावसंख्येत 47 धावांचे दुसरे सर्वाधिक योगदान दिले. यावेळी त्याने 34 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने ही धावसंख्या उभारली. यामुळे त्याने खास यादीत स्थान पटकावले.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार हा भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 44 डावांमध्ये 46.43च्या सरासरीने 1625 धावा चोपल्या आहेत. या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli) हा अव्वलस्थानी आहे. त्याने 107 डावांमध्ये 4008 धावा केल्या आहेत. यादीत दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) असून त्याने 140 डावांमध्ये 3853 धावा केल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी केएल राहुल (KL Rahul) आहे. त्याने 68 डावात 2265 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. त्याने 66 डावांमध्ये 1759 धावा केल्या आहेत. (Most runs for India in mens T20I )
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
4008 धावा- विराट कोहली (डाव- 107)
3853 धावा- रोहत शर्मा (डाव- 140)
2265 धावा- केएल राहुल (डाव- 68)
1759 धावा- शिखर धवन (डाव- 66)
1625 धावा- सूर्यकुमार यादव (डाव- 44)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘असा विचारच केला नव्हता…’, कॅप्टन हार्दिक पंड्याने कुणावर फोडले पराभवाचे खापर?
कौतुक केलंच पाहिजे! 12 डावात न जमलेली कामगिरी सुंदरने एकाच डावात करून दाखवली, एक नजर टाकाच