क्रिकेट चाहते ज्या प्रसिद्ध टी२० लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती इतर कोणती नसून इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामाचे बिगुल येत्या २६ मार्च रोजी वाजणार आहे. आता आयपीएल सुरू होण्यास फक्त ६ दिवस शिल्लक राहिले आहेत. या हंगामात ८ नाही, तर १० आयपीएल संघ खेळताना दिसणार आहेत. नव्याने सामील झालेल्या संघांमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांचा समावेश आहे. अशात या हंगामात एकापेक्षा एक खेळाडू आपला दम दाखवणार आहेत. मात्र, तत्पूर्वी आपण आयपीएलच्या इतिहासात प्ले-ऑफमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात लायन्स (Gujrat Lions) (२०१६-१७) संघाकडून खेळलेल्या सुरेश रैनाचा (Suresh Raina) समावेश आहे. रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणूनही ओळखले जाते. रैनाने आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ७१४ धावा कुटल्या आहेत. मात्र, रैनाला आयपीएल २०२२मध्ये खरेदीदार न मिळाल्याने तो या हंगामात खेळू शकणार नाही.
रैनानंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) समावेश आहे. धोनीने आयपीएल प्ले-ऑफ सामन्यांमध्ये खेळताना ५२२ धावा केल्या होत्या. यानंतर ३८९ धावांसह ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन (Shane Watson) तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचाच मायकल हसी (Michael Hussey) असून त्याने ३८८ धावा केल्या आहेत. यानंतर पाचव्या क्रमांकावर मुरली विजय (३६४ धावा), सहाव्या क्रमांकावर ड्वेन स्मिथ (३५१ धावा), सातव्या क्रमांकावर फाफ डू प्लेसिस (३४८ धावा) आणि आठव्या क्रमांकावर कायरन पोलार्ड (३४१) आहे.
आयपीएल प्ले-ऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
७१४ धावा- सुरेश रैना
५२२ धावा- एमएस धोनी
३८९ धावा- शेन वॉटसन
३८८ धावा- मायकल हसी
३६४ धावा- मुरली विजय
३५१ धावा- ड्वेन स्मिथ
३४८ धावा- फाफ डू प्लेसिस
३४१ धावा- कायरन पोलार्ड
महत्त्वाच्या बातम्या-
‘माही’ची विकेट घेतल्यानंतर आता ‘या’ गोलंदाजाने केले विराट कोहलीला टार्गेट; म्हणाला…
कोहली, गंभीरमधील २०१३च्या विवादावर व्यक्त झाला केकेआरचा माजी कर्णधार, दिलीय अशी प्रतिक्रिया