टी-२० क्रिकेट आल्यापासून वनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली आहे, असे म्हटले जात आहे. जेव्हा वनडे क्रिकेट आले होते तेव्हा कसोटी क्रिकेटबाबत देखील असेच म्हटले गेले होते. परंतु असे काहीच झाले नाही कारण, तिन्ही स्वरूपाच्या दर्शकांवर कोणताही परिणाम झाला नाही आणि प्रत्येक स्वरूपाचे वेगवेगळे चाहते बनले. कमी वेळेत निकाल लागल्याने अधिक लोकांना टी-२० क्रिकेट बघायला आवडते, ही वस्तुस्थिती आहे. पण दोन्ही फॉरमॅटचे प्रेक्षकही कमी झालेले नाहीत.
वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारतीय फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. सचिन तेंडुलकर,राहुल द्रविड आणि सौरव गांगुली पासून ते विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वनडे क्रिकेटला पुढे नेण्याचे काम सुरू ठेवले आहे. या सर्वांच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम आहे. परंतु असेही काही फलंदाज आहेत ज्यांना शतक पूर्ण करण्यात यश आले नाही. तरीदेखील त्यांच्या नावे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.
१) हार्दिक पंड्या – भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत एकूण ६३ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १२८६ धावा करण्यात यश आले आहे. हार्दिक पंड्याने या दरम्यान ७ अर्धशतक झळकावले आहेत. मात्र त्याला आपल्या कारकीर्दीत एकही शतक झळकावता आले नाहीये. ९२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ११६ पेक्षा ही अधिकचा होता.
२) दिनेश कार्तिक – दिनेश कार्तिकने २००४ मध्ये आपल्या वनडे कारकिर्दीला सुरुवात केली होती. एमएस धोनी संघात असताना दिनेश कार्तिकला खूप कमी संधी मिळाली होती. त्याच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९४ सामने खेळले, ज्यामध्ये त्याला १७५२ धावा करण्यात यश आले होते. यादरम्यान त्याने ९ अर्धशतक झळकावले तर ७९ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तसेच त्याने ७३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
३) रवींद्र जडेजा – रवींद्र जडेजाने क्रिकेटच्या तीनही स्वरूपात आपली वेगळी छाप सोडली आहे. वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावल्याशिवाय सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा अव्वलस्थानी आहे. त्याने आतापर्यंत एकूण १६८ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला २४११ धावा करण्यात यश आले आहे. या दरम्यान त्याने १३ अर्धशतक झळकावले आहेत. तर ८७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.त्याची फलंदाजी सरासरी ३२ पेक्षा ही जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाप से बेटा सवाई! असे ३ मातब्बर क्रिकेटर, जे बनले त्यांच्या वडिलांपेक्षाही जास्त यशस्वी
अविस्मरणीय षटकार! विश्वचषकातील तीन सिक्स जे भारतीय प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ‘हे’ ३ भारतीय खेळाडू भरुन काढतील सलामीवीर रोहित शर्माची कमतरता