आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण दोन भाऊ एका संघाकडून खेळताना पहिले आहेत. यामध्ये ऑस्ट्रिलयन बंधू स्टिवॉ आणि मार्क वॉ यांनी एक काळ गाजवला होता. भारताकडून खेळताना इरफान आणि युसूफ या पठाण बंधूनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. झिम्बाबेचा संघ आज जरी क्रिकेटपासून दूर जात असला, तरी एकेकाळी अँडी आणि ग्रँड या फ्लॉवर बंधूनी झिम्बाबेसाठी मैदान गाजवल होतं. पण आज आपण या लेखात बघणार आहोत क्रिकेटमधील बाप-लेकाच्या जोड्या, ज्यामध्ये आपल्या वडिलांपेक्षाही जास्त यश त्यांच्या मुलांनी मिळवलं आहे.
वॉल्टर हॅडली आणि रिचर्ड हॅडली
रिचर्ड हॅडली हे न्यूजीलंड वेगवान गोलंदाज होते. जगातील यशस्वी गोलंदाजांमध्ये त्यांचा समावेश होतो. रिचर्ड हे कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेणारे पहिले गोलंदाज होते. आपल्या गोलंदाजी सोबतच रिचर्ड आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांना एक यशस्वी अष्टपैलू म्हणून ओळखले जाते, त्यांचा या खेळाची दखल घेऊन न्यूजीलंड सरकारने १९९० साली नाईटहूड या पुरस्काराने सन्मानित केले.
याउलट रिचर्ड यांचे वडील वॉल्टर यांची कारकीर्द एवढी प्रभावी नव्हती. त्यांनी न्यूजीलंडकडून फक्त ११ सामने खेळले होते. त्यांनी काही सामन्यात न्यूजीलंडचे प्रतिनिधित्वसुद्धा केले होते. तसेच ते न्यूजीलंडच्या निवडसमितीचे प्रमुख म्हणून ही कार्यरत होते.
पीटर पॉलक आणि शॉन पॉलक
शॉन पॉलक हे दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील कधीही न विसरता येणार नाव आहे. ९०च्या दशकात कित्येक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने शॉन पॉलक यांनी घाम फोडला होता. द. आफ्रिकेचे यशस्वी गोलंदाज म्हणून पॉलक यांच्याकडे पहिले जाते, त्यांनी १०८ कसोटी सामन्यात ४२१ विकेट घेतल्या आहेत. तसेच फलंदाजीतही जवळपास ३३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
एकदिवसीय सामन्यात पण त्यांनी आपल्या गोलंदाजीने प्रभावित करत ३९३ विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजी सोबतच पॉलक आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. आयपीएलमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सकडून काही सामन्यात प्रतिनिधित्व केले होते, एकंदरीत शॉन पॉलक यांचं दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी योगदान खूप मोठं आहे.
शॉन पॉलक यांचे वडीलसुद्धा वेगवान गोलंदाज होते, पण पीटर यांना शॉन इतका प्रभावी खेळ करता आला नाही. त्यांनी द. आफ्रिकेकडून २८ कसोटी सामने खेळताना १०८ विकेट घेतल्या आहेत.
योगराज सिंग आणि युवराज सिंग
युवराज सिंगशिवाय भारतीय क्रिकेट अपूर्ण आहे. एक महान खेळाडू म्हणून युवराज सिंग याचं नाव क्रिकेटमध्ये कायम स्मरणात राहील. आपल्या फलंदाजी, गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणासाठी युवराज सिंगला ओळखलं जात. २००७ च्या टी२० विश्वचषकात ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा पराक्रम युवराजने केला होता. तसेच २०११ साली झालेल्या विश्वचषक विजयात युवराज सिंगच योगदान खूप मोठं होत. त्याला २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा मालिकावीराचा सन्मानसुद्धा मिळाला आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला म्हणावा तितका प्रभाव पाडता आला नाही.
याउलट त्याचे वडील योगराज सिंग यांनी भारताकडून फक्त १ कसोटी सामना खेळला असून त्यातही फक्त १ विकेट मिळवला होता. तसेच ५ एकदिवसीय सामन्यात त्यांनी ४ विकेट घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अविस्मरणीय षटकार! विश्वचषकातील तीन सिक्स जे भारतीय प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ‘हे’ ३ भारतीय खेळाडू भरुन काढतील सलामीवीर रोहित शर्माची कमतरता
टी२० विश्वचषक २००७ च्या फायनलमधील स्कूप शॉट पुन्हा टीव्हीवर पाहून मिस्बाह उल हकने दिली ‘अशी’ रिऍक्शन