---Advertisement---

आज विराट पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला लावणार सुरूंग

On: रविवार, जानेवारी 19, 2020 1:39 PM
---Advertisement---

बंगळूरु। आज (19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

विराटने या सामन्यात जर 37 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाकिस्तानचा दिग्गज माजी फलंदाज इंजमाम उल हकला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर येईल.

सध्या विराटच्या वनडेमध्ये 245 वनडे सामन्यात 59.70 च्या सरासरीने 11703 धावा आहेत. तर इंझमाम उल हकच्या 378 वनडे सामन्यात 11739 धावा आहेत. इंजमाम सध्या वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तर विराट सातव्या क्रमांकावर आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 463 वनडे सामन्यात 18426 धावा केल्या आहेत.

वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)

14234 धावा – कुमार संगकारा (404 सामने)

13704 धावा – रिकी पाँटिंग (375 सामने)

13430 धावा – सनथ जयसुर्या (445 सामने)

12650 धावा – माहेला जयवर्धने (448 सामने)

11739 धावा – इंजमाम उल हक (378 सामने)

11703 धावा – विराट कोहली (245 सामने)

https://twitter.com/Maha_Sports/status/1218799421770518531

https://twitter.com/Maha_Sports/status/1218540925640531969

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---