कोणत्याही फलंदाजासाठी शून्यावर बाद होणे ही निराशाजनक गोष्ट असते. पण अनेक क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीत एकदातरी शून्यावर बाद होण्याची वेळ येते. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०९९ खेळाडू खेळले आहेत. त्यातील ३२४४ एवढे खेळाडू किमान एकदा तरी शून्यावर बाद झाले आहेत.
पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शून्यावर बाद होण्याआधी सर्वाधिक डाव खेळण्याचा विश्विविक्रम हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नावावर आहे. तसेच त्याच्या नावावर पदार्पणानंतर पहिल्यांदा शून्यावर बाद होण्याआधी सर्वाधिक धावा करण्याचाही विश्वविक्रम आहे.
डूप्लेसिसने जानेवारी २०११ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो तब्बल १०८ डाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर पहिल्यांदा शून्यावर बाद झाला. या दरम्यान त्याने ३७०७ धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शून्यावर बाद होण्याआधी सर्वाधिक धावा करण्यामध्ये डू प्लेसिसपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर त्याचा लहानपणीचा मित्र आणि संघसहकारी एबी डिविलियर्स आहे. डिविलियर्स २००४ मध्ये पदार्पण केले होते. त्याच्या पदार्पणानंतर तो ८४ डाव खेळल्यानंतर आणि २६८१ धावा केल्यानंतर पहिल्यांदा शून्यावर बाद झाला होता.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मार्क टेलर आहे. मार्क टेलर यांनी १९८९ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ते ५७ डाव खेळल्यानंतर पहिल्यांदा शून्यावर बाद झाले होते. या ५७ डावात त्यांनी २५२५ धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शुन्यावर बाद होणाच्या आधी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी आहे, तर पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू यासिर हमीद आहे.
कांबळीने ऑक्टोबर १९९१ ला आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर तो शून्यावर पहिल्यांदा बाद होण्याआधी ५९ डाव खेळला. या दरम्यान त्याने २३८१ धावा केल्या. तसेच यासिर हमीदने २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर ५८ डावात २३७६ धावा केल्यावर तो पहिल्यांदा शून्यावर बाद झाला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शून्यावर बाद होण्याआधी सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू (Most runs scored before first duck in International matches) –
३७०७ धावा – फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका) (१०८ डाव)
२६८१ धावा – एबी डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका) (८४ डाव)
२५२५ धावा – मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया) (५७ डाव)
२३८१ धावा – विनोद कांबळी (भारत) (५९ डाव)
२३७६ धावा – यासिर हमीद (पाकिस्तान) (५८ डाव)
ट्रेंडिंग घडामोडी –
१७ वर्षांपुर्वी इरफानला पाकिस्तानचा तो खेळाडू असं काही वाईट बोलला होता की आजही…
आपण ज्या वयात बारावीत शिकतं होतो त्या वयात ते खेळले होते ५० वनडे
…म्हणून धोनी आहे विराट-सचिनला सरस, कारकिर्दीच्या सुरुवातीला या कारणाने ठरला हिरो