---Advertisement---

कर्णधार कोहलीने शानदार अर्धशतक करत क्लाइव्ह लॉइड, ब्रायन लाराला टाकले मागे

---Advertisement---

कालपासून(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात 5 बाद 264 धावा केल्या आहेत. या डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आहे. याबरोबरच एक खास विक्रम केला आहे.

विराटने काल 163 चेंडूत 10 चौकारांसह 76 धावांची खेळी केली. भारताचा कसोटी कर्णधार असताना 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची विराटची ही 24 वी वेळ आहे.

त्यामुळे त्याने कसोटीत सर्वाधिक वेळा 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत आता चौथा क्रमांक मिळवला असून वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज कर्णधार क्वाईव्ह लॉइड आणि ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. लॉइड आणि लारा यांनी कर्णधार म्हणून कसोटीत प्रत्येकी 23 वेळा 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथ आहे. स्मिथने 33 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर स्मिथच्या पाठोपाठ रिकी पॉटिंग आणि ॲलन बाॅर्डर आहेत. पॉटिंगने 31 आणि बॉर्डर यांनी 30 वेळा असा कारनामा केला आहे.

कालपासून सुरु झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट बरोबरच सलामीवीर फलंदाज मयंक अगरवानेही 55 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच वेस्ट इंडीजकडून पहिल्या दिवसाखेर कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.

कर्णधार असताना कसोटीत सर्वाधिकवेळा 75+ धावा करणारे खेळाडू – 

33- ग्रॅमी स्मिथ

31- रिकी पाॅटींग

30- ॲलन बाॅर्डर

24- विराट कोहली

23- क्लाईव्ह लाॅईड

23- ब्रायन लारा

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीज विरुद्ध कसोटीत संधी न मिळालेल्या शिखर धवनचा झाला या भारतीय संघात समावेश

याच दिवशी ८ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment