---Advertisement---

आयपीएल 2026 मध्ये तुटला 1294 षटकारांचा रेकॉर्ड! या हंगामात मारले ‘इतके’ सिक्स, वैभव-अभिषेकचा धुमाकूळ

On: रविवार, मे 24, 2026 2:17 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये अनेक विक्रम रचले गेले आहेत, जे मागील १८ हंगामांमध्येही झाले नाहीत. त्यामध्ये आता शनिवारी (२३ मे) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यानंतर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आयपीएल २०२६ चा हंगामात सर्वाधिक षटकार मारले गेले आहेत. मागील हंगामात षटकारांची संख्या १२९४ एवढी होती, जी या हंगामात मोडली आहे.

आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १३०५ षटकार मारले गेले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच हंगामात १३०० षटकारांचा टप्पा ओलांडला गेला आहे. तसेच या स्पर्धेत २ लीग सामने आणि ४ प्लेऑफचे सामने बाकी आहेत. यामुळे १४०० षटकारांचा टप्पा ओलांडला जाण्याची शक्यता आहे.

एकाच आयपीएल हंगामात मारलेले सर्वाधिक षटकार
२०२६ मध्ये १३०५ षटकार
२०२५ मध्ये १२९४ षटकार
२०२४ मध्ये १२६० षटकार
२०२३ मध्ये ११२४ षटकार
२०२२ मध्ये १०६२ षटकार

आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ५३ षटकार मारले असून, एकाच हंगामात कोणत्याही भारतीय खेळाडूने मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. तसेच तो आता आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या क्रिस गेलच्या (५९) विक्रम मोडण्याच्या प्रयत्नात आहे. आज (२४ मे) राजस्थानचा सामना मुंबई इंडियन्सशी असून त्यामध्ये वैभवची बॅट चालली तसेच हा सामना राजस्थानने जिंकला तर तो नक्कीच गेलचा रेकॉर्ड मोडेल.

वैभव व्यतिरिक्त आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या या यादीत भारताचा आणखी एक खेळाडू आहे. सनरायझर्स हैद्राबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने आतापर्यंत या हंगामात ४३ षटकार मारले आहेत. एसआरएच प्लेऑफमध्ये दाखल झाला असून त्याला आणखी षटकार मारण्याची संधी आहे.

आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
वैभव सूर्यवंशी – ५३
अभिषेक शर्मा – ४३

रायन रिकल्टन – ३७
मिचेल मार्श – ३६
कूपर कॉनोली – ३२

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---