---Advertisement---

एमएस धोनीप्रमाणेच यष्टीरक्षक केएल राहुलनेही केला टी२०मध्ये मोठा पराक्रम

On: रविवार, जानेवारी 26, 2020 3:56 PM
---Advertisement---

ऑकलँड। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(26 जानेवारी) दुसरा टी20 सामना इडन पार्क येथे पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात केएला राहुलने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

त्याने 50 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. राहुलचे हे भारताचा यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मधील दुसरे अर्धशतक आहे.

त्यामुळे भारताकडून यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या एमएस धोनीच्या विक्रमाची राहुलने बरोबरी केली आहे. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज धोनीनेही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2 अर्धशतके केली आहेत.

आजच्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 132 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 133 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 17.3 षटकात 135 धावा करत सहज पार केले. राहुलला श्रेयस अय्यरने चांगली साथ दिली. अय्यरने 44 धावांची खेळी केली. तसेच राहुल आणि अय्यरने 86 धावांची तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे भारतीय यष्टीरक्षक – 

2 – एमएस धोनी

2 – केएल राहुल

1 – रिषभ पंत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---