---Advertisement---

विराट कोहलीचा नादच खुळा! पुन्हा रोहित शर्माचा तो विक्रम मोडला

---Advertisement---

इंदोर। मंगळवारी(7 जानेवारी) होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवत टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माला मागे टाकत एक मोठा विश्वविक्रमही केला आहे.

विराटने या सामन्यात 17 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 30 धावा केल्या. त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हा विश्वविक्रम करताना त्याने रोहितला मागे टाकले आहे.

विराटच्या आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 77 सामन्यात 53.26 च्या सरासरीने 2663 झाल्या आहेत. तसेच रोहितच्या 104 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 32.10 च्या सरासरीने 2633 धावा आहेत.

मंगळवारच्या सामन्यापूर्वी रोहित आणि विराट आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत प्रत्येकी 2633 धावांसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर होते. पण आता विराटने मंगळवारी पहिली धाव घेताच या यादीत रोहितला मागे टाकले आहे.

रोहितला सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या या टी20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे विराटला 10 जानेवारीला श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात चांगली खेळी करत त्याच्यातील आणि रोहितमधील धावांच्या फरकाचे अंतर वाढवण्याची संधी असेल.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

2663- विराट कोहली, सामने – 77

2633- रोहित शर्मा, सामने – 104

2436- मार्टिन गप्टील, सामने – 83

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---