क्रिकेटविश्वासाठी 2022 मध्ये अनेक आठवणीत राहण्यासारखे प्रसंग घडले. 2023 सुरू होत असताना प्रत्येक क्रिकेटप्रेमीला मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या काही अविस्मरणीय सामन्यांची आठवण येणार यात शंका नाही. 2022 मध्ये खेळाडू आणि संघांनी अनेक नवे विक्रम बनवले. याचसोबत मैदानात काही वाद देखील चाहत्यांना पाहायला मिळाले. आपण या लेखात 2022 मध्ये झालेल्या 7 वादांविषयी चर्चा करणार आहोत, जे क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले. हे वाद 2022 मध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय बनले होते.
रविंद्र जडेजा आणि सीएसकेमध्ये मतभेत –
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 15 वा हंगाम 2022 मध्ये खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनी याच्या नेतृत्वात चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असल्या, तरी धोनीने आयपीएल 2022 हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. असात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) संघातील अनुभवी खेळाडू असल्यामुळे त्याला सीएसकेच्या नेतृत्वाची संधी दिली गेली. मात्र, अष्टपैलू जडेजा कर्णधारपदाचा दबाव पेलू शकला नाही. त्याच्या नेतृत्वात सीएसके आणि त्याचे स्वतःचे प्रदर्शन ढासळले आणि त्याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय देखील घेतला.
माध्यमांतील वृत्तांनुसार जडेजाने आयपीएल 2022 हंगामाच्या मध्यात संघाचे सोडलेले कर्णधारपद हा त्याचा नाहीतर फ्रँचायझीचा निर्णय होता. जडेजानंतर एमएस धोनी पुन्हा एकदा सीएसकेचा कर्णधार बनला. एवढेच नाही जडेजा आणि सीएसके यांनी सोशल मीडियावर देखील एकमेकांना अनफॉलो केले होते, ज्यामुळे हा वाद अधिकच चिघळला. पण आता अखेर सीएसके आणि जडेजातील वाद मिटल्याचे पाहायला मिळत आहे. जडेजा आगमी आयपीएल हंगामात देखील सीएसकेसाठी खेळणार आहे.
जेव्हा रिषभ पंतने त्यांच्या फलंदाजांना मैदाना सोडण्याचा इशारा केला –
क्रिकेट हा जंटलमेन्स गेम म्हणून ओळखला जातो. पण कधी-कधी खेळाडू क्रिकेटच्या मैदानात संयम गमावून बसतात. अशा वेळी खेळाडू असे काही कृत्य करतात जे त्यांच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला शोभत देखील नसते. आयपीएल 2022 च्या 34 व्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याकडून देखील असेच काहीचे घडले होते. दिल्ली कॅफिट्लचे नेतृत्व करणाऱ्या रिषभने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत खेळाडूंना पुन्हा माघारी बोलवले होते.
दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 222 धावांचे लक्ष मिळाले होते आणि शेवटच्या षटकात त्यांना 36 धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर ओबेड मॅकॉयने सलग तीन षटकार मारले. पण त्यानंतर चौथ्या चेंडूवर पंचांनी नो बॉल दिला नाही, म्हणून रिषभ पंत संतापल्याचे पाहायला मिळाले. चेंडू कंबरेच्या बर फुलटॉस होता आणि पंतच्या मेत पंचांना हा नो बॉल घोषित केला पाहिजे होता. पंचांच्या निर्णयावर पंतने नाराजी व्यक्त करत त्यांच्या फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा केला होता. पण दिल्लीचे सहायक प्रशिक्षक प्रवीन आमरे यांनी पंचांशी चर्चा करून हे प्रकरण शांत केले. दिल्लीने हा सामना गमावला, पण पंतचे हे वर्तन मात्र अनेकांना खटकले.
टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नो बॉलचा निर्णय –
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात खेळला गेला. भारतीय संघ या विश्वचषकात विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता. मात्र उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने मात देत विश्वचषक देखील नावावर केला. भारतीय संघाने स्पर्धेतील त्यांच्या अभियानाची सुरुवात पाकिस्तानला पराभूत करून केली. पण पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यातील एका चेंडूमुळे चांगलाच वाद पेटला होता.
भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 16 धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाज या षटकात गोलंदाजी करत होता. शेवटच्या 3 चेंडूंवर 13 धावांची गरज असताना नवाजने फुलटॉस चेंडू टाकला आणि विराटने यावर षटकार देखील मारला. चेंडू जास्त उंचिवर असल्यामुळे विराटने पंचांकडे नो बॉलसाठी फक्त पाहिलेच, तितक्यात पंचांनी नो बॉलचा निर्णय दिला देखील. पाकिस्तानला या सामन्यात पारभव स्वीकारावा लागला आणि त्यांच्या कर्णधारासह अनेक दिग्गजांनी पंचांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या नो बॉलची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यांत चाहत्यांमध्ये हातापायी
2022 मध्ये आशिया चषक खेळला गेला. श्रीलंका या मानाच्या स्पर्धेचा विजेता संघ बनला. या स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ आमने सामने आले होते. पाकिस्तान आणि अफघाणिस्तान यांच्यातील हा सामना प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरलाच, पण चाहत्यांमध्ये जोरदार मारहान देखील पाहायला मिळाली.
अफगाणिस्तानने या सामन्यात 126 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तान संघाने त्यांना चांगलेच अडचणीत टाकले होते. 19 व्या षटकात आसिफ अलीला फरीद अहमदने बाद केले होते, ज्यानंतर फरीदने आसिफला चिडवण्याचाही प्रयत्न केला होता. यावर पाकिस्तानी फलंदाज चिडला आणि गोलंदाजावर बॅट देखील उगारली होती. मैदानातील हे प्रकरण मिटेपर्यंतच स्टॅन्ड्समध्ये चाहत्यांचा वाद सुरू झाला. हा वाद पुढे हातापाईवर उतरला आणि क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनला.
विराटवर लावला गेला फेक फिल्डिंगचा आरोप
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणास्तव वादात अडकत आला आहे. 2022 मध्ये टी-20 विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात देखील विराट एका कारणास्तव वादात अडकला. या सामन्यात विराटवर फेक फिल्डिंगचा आरोप केला गेला. बांगलादेश संघ फलंदाजी करत असताना 7 व्या षटकात एक शॉट लाँगऑनच्या दिशेने खेळला गेला. त्याठिकाणी अर्शदीप सिंग क्षेत्ररक्षणाला उभा होता. मिडविकेटवर उभा असलेल्या विराटने रिले थ्रोची एक्शन केली. याच कारणास्तव बांगलादेश संघाकडून विराटवर फेक फिल्डिंगचा आरोप केला गेला होता. असे असले तरी, हे प्रकरण काही काळासाठी चर्चेत राहिल्यानंतर पुन्हा शांत झाले.
रियान पराग आणि हर्षल पटेल यांच्यातील घमासान
आयपीएलमध्ये आजपर्यंत अनेक युवा खेळाडू आले, ज्यांनी पुढे भारतीय संघासाठी पदार्पण करत मोठी कारकीर्द बनवली. युवा खेळाडूंसाठी आयपीएल स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम स्पर्धा मानली जात असते. पण याच आयपीएलमध्ये हे युवा खेळाडू अनेकदा संयम गमावून बसतात. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील एका सामन्यात दोन युवा खेळाडूंमध्ये वाद पाहायला मिळाला. हे युवा खेळाडू होते रियान पराग आणि हर्षल पटेल.
राजस्थानसाठी फलंदाजी करताना रियान परागने हर्षल पटेलच्या एका षटकात 18 धावा लुटल्या. या तुफान फटकेबाजीनंतर हर्षल पटेल आणि रियान परागमध्ये वाद पेटला. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर देखील गेले. संघातील सहकारी खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद कसाबसा मिटला. पण सामना संपल्यानंतर देखील या दोघांनी एकमेकाच्या हातात हात दिला नाही. या दोघांतील हे घमासान आयपीएल इतिहासातील सर्वात चर्चेत राहिल्या वादांपैकी एक ठरला आहे. (Most talked about cricket controversies in 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: डिवायडरला धडकून हवेत उडाली कार! रिषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते