---Advertisement---

टाॅप ५- या संघांकडे आहेत कसोटी पदार्पणात सर्वाधिक शतके करणारे खेळाडू

On: गुरूवार, ऑक्टोबर 4, 2018 5:26 PM
---Advertisement---

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून 18 वर्षीय सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पदार्पण करताना शतक झळकावले आहे.

तो पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक करणारा जगातील 106 वा तर भारताचा 15 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी भारताकडून पदार्पणाच्या कसोटी सामन्यात लाला अमरनाथ, दिपक सोधन, क्रिपाल सिंग, अब्बास अली बेग, हनुमंत सिंग, गुंडप्पा विश्वनाथ, सुरिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, प्रविण आम्रे, सौरव गांगुली, वीरेद्र सेहवाग, सुरेश रैना, शिखर धवन आणि रोहीत शर्मा या खेळाडूंनी शतकी खेळी केली आहे.

त्यामुळे एका संघाकडून कसोटी पदार्पणात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताने या यादीत विंडिज संघाच्या 14 शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर आॅस्ट्रेलिया आहे. त्यांच्या 20 क्रिकेटपटूंनी कसोटी पदार्पणात शतकी खेळी केली आहे. आॅस्ट्रेलियाच्या पाठोपाठ इंग्लंड संघ असून त्यांच्या 19 खेळाडूंनी असा पराक्रम केला आहे.

या संघांकडे आहेत कसोटी पदार्पणात सर्वाधिक शतके करणारे खेळाडू-

20 – आॅस्ट्रेलिया

19 – इंग्लंड

15 – भारत

14 – विंडिज

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment