---Advertisement---

किंग कोहलीचे नाव आता या दिग्गज कर्णधारांच्या यादीत सन्मानाने घेतले जाणार

On: रविवार, नोव्हेंबर 24, 2019 9:43 PM
---Advertisement---

कोलकाता। भारताने बांगलादेश विरुद्ध इडन गार्डनवर झालेल्या दिवस-रात्र कसोटीत आज(24 नोव्हेंबर) एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या(Virat Kohli) नावावर खास विक्रम झाला आहे.

विराटचा हा भारताचा कसोटी कर्णधार म्हणून 33 वा विजय होता. त्यामुळे तो कसोटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या एकूण कर्णधारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे. या यादीत त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधर ऍलेन बॉर्डर यांना मागे टाकले आहे. त्यांनी कसोटीमध्ये कर्णधार म्हणून 32 विजय मिळवले आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) आहे. त्याने कर्णधार म्हणून 53 विजय मिळवले आहेत. तसेच कर्णधार म्हणून 50 पेक्षा अधिक विजय मिळवणाराही तो सध्या एकमेव कर्णधार आहे.

त्याचबरोबर विराटने कसोटी कर्णधार म्हणून एका डावाने मिळवलेला आजचा 11 वा विजयही आहे. त्यामुळे तो कसोटीमध्ये एका डावाने सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या एकूण कर्णधारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

त्याने या यादीत क्लाईव्ह लॉइड (Clive Lloyd), स्टिफन फ्लेमिंग(Stephen Fleming) आणि अँड्र्यू स्ट्रॉस(Andrew Strauss) यांची बरोबरी केली आहे. या तिघांनीही कसोटीमध्ये एका डावाने 11 विजय मिळवले आहेत. या यादीतही अव्वल क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ आहे. त्याने कसोटीत 22 वेळा कर्णधार म्हणून एका डावाने विजय मिळवले आहेत.

#कसोटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार – 

53 – ग्रॅमी स्मिथ

48 – रिकी पॉटिंग

41 – स्टिव्ह वॉ

36 – क्वाइव्ह लॉइड

33 – विराट कोहली

32 – ऍलेन बॉर्डर

#कसोटीत एका डावाने सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार – 

22 – ग्रॅमी स्मिथ

14 – स्टिव्ह वॉ

12 – पिटर मे

11 – क्लाइव्ह लॉइड

11 – स्टिफन फ्लेमिंग

11 – अँड्र्यू स्ट्रॉस

11 – विराट कोहली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---