पॅट कमिन्सच्या अनुपस्थित स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया संघ ऍशेस मालिका २०२१ (Ashes Series 2021) मधील दुसरा कसोटी सामना (Second Test) ऍडलेड येथे खेळतो आहे. १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडवर २८२ धावांनी आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात स्मिथने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. केवळ ७ धावांमुळे त्याचे या सामन्यातील शतक हुकले. मात्र या खेळीसह त्याने मोठा विक्रम केला आहे.
स्मिथने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ९३ धावा कुटल्या. २०१ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. पुढे इंग्लंडच्या जेम्स अंडरसनने त्याला पायचित करत त्याला शतकापासून वंचित ठेवले. मात्र धावांची पन्नाशी करत स्मिथने फॅब फोर (FAB4) मध्ये कसोटी संघाचा कर्णधार म्हणून मोठा विक्रम केला आहे. तो फॅब फोरमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कसोटी कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
स्मिथने आतापर्यंत कसोटीचा कर्णधार म्हणून २९ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ६१ डावांमध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, या सामन्यातून स्मिथने कसोटी संघाचा कर्णधार म्हणून संघात पुनरागमन केले आहे. यापूर्वी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे त्याच्या हातून संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे काढून घेण्यात आली होती.
याबाबतीत स्मिथने न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला मागे टाकले आहे. विलियम्सन ६१ डावांमध्ये १५ वेळा धावांची पन्नाशी पार करत या यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. तर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या व इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट अव्वलस्थानी आहे. हे तिघेही क्रिकेटविश्वातील फॅब फोरमध्ये समाविष्ट असणारे क्रिकेटपटू आहेत.
कसोटीत सर्वाधिक वेळा ५० + धावा करणारे ‘फॅब फोर’मधील कर्णधार
३७: जो रूट (१०५ डाव)
३७: विराट कोहली (१०९ डाव)
२९: स्टिव्ह स्मिथ (६१ डाव)*
२५: केन विल्यमसन (६१ डाव)
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर
ऍडलेड कसोटीत ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बांधले ब्लॅक आर्म बँड, कारण ऐकून कोसळेल रडू
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान नाहीच! आता आयसीसी म्हणतेय…