आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी (२६ सप्टेंबर) डबल हेडर सामन्याचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. यातील पहिला सामना अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. या सामन्यात चांगलीच काट्याची टक्कर पाहायला मिळाली. चेन्नईने शेवटच्या चेंडूवर १ धाव काढत सामना खिशात घातला. यासह यासह चेन्नईने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? की, आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना कोणत्या संघाने शेवटच्या चेंडूवर सर्वाधिक वेळा विजय मिळवला आहे? नाही, चला तर मग जाणून घेऊया…
केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७१ धावा करत सीएसकेसमोर १७२ धावांचा डोंगर उभा केला होता. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिले दोन सामने जिंकणारा सीएसके संघ केकेआरविरुद्धचा हा सामनाही सहजरीत्या जिंकेल असं वाटत होतं. मात्र, केकेआरपुढे सीएसकेला चांगलीच धडपड करावी लागली.
शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी ४ धावांची आवश्यकता होती. केकेआरकडून सुनील नरेन गोलंदाजी करत होता, तर सीएसकेकडून सॅम करण स्ट्राईकवर होता. मात्र, नरेनच्या पहिल्याच चेंडूवर करन झेलबाद झाला. त्यानंतर फलंदाजीला शार्दुल ठाकूर आला होता. यावेळी नरेनने दुसरा चेंडू निर्धाव टाकला. मात्र, पुढच्या चेंडूवर शार्दुलने तिहेरी धाव घेतली. यानंतर स्ट्राईकवर रवींद्र जडेजा आला. जडेजाने चौथा चेंडू निर्धाव खेळला आणि पाचव्या चेंडूवर पायचीत झाला. त्यानंतर दीपक चाहर स्ट्राईकवर आला आणि त्याने जोरदार फटका मारत शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून संघाला सामना जिंकून दिला.
आयपीएलमध्ये आतापर्यंत सीएसकेने शेवटच्या चेंडूवर सर्वाधिक वेळा सामना जिंकला आहे. त्यांनी एकूण ७ वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला आहे. सीएसकेपाठोपाठ या यादीत दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्सचा क्रमांक लागतो. मुंबईने आतापर्यंत ६ वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने ४ वेळा आणि पंजाब किंग्सने ३ वेळा असा कारनामा केला आहे.
आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकणारे संघ
७ वेळा- चेन्नई सुपर किंग्स*
६ वेळा- मुंबई इंडियन्स
४ वेळा- राजस्थान रॉयल्स
३ वेळा- पंजाब किंग्स
महत्त्वाच्या बातम्या-
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!






