हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शनिवारी(2 मार्च) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताकडून एमएस धोनीने नाबाद 59 आणि केदार जाधवने नाबाद 81 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 141 धावांची भागीदारीही रचली.
याबरोबरच धोनीने जॅक कॅलिसच्या एका खास विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. धोनीने वनडेमध्ये नाबाद राहत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
धोनीने आत्तापर्यंत 36 वेळा नाबाद राहत वनडेमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात त्याच्या 6 शतकांचा आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. कॅलिसनेही वनडेमध्ये 36 वेळा नाबाद राहत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
याबरोबरच धोनी हा भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने भारताकडून 216 षटकार मारले आहेत.
भारताकडून वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
२१६- माही
२१५- हिटमॅन
१९५- मास्टर ब्लास्टर
१८९- दादा
१५३- युवी#INDvAUS #msdhoni #dhoni— Sharad Bodage (@SharadBodage) March 2, 2019
वनडेमध्ये नाबाद राहत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू-
36 – एमएस धोनी/ जॅक कॅलिस
32 – इंझमाम उल हक
29 – सचिन तेंडुलकर
28 – मोहम्मद युसुफ
27 – मोहम्मद अझरुद्दिन/ एबी डिविलियर्स/ विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या-
–अनेक वर्षांनी विराट कोहलीच्या बाबतीत घडली अशी घटना…
–विराटबरोबर २००८च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळलेले खेळाडू सध्या काय करतात, वाचा
–बीसीसीआयने विंग कमांडर अभिनंदन यांना दिली क्रमांक १ ची जर्सी