---Advertisement---

अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील

---Advertisement---

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथा कसोटी सामन्यातगुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा  केल्या आहेत.

इंग्लंडकडून सॅम करनने ८व्या क्रमांकावर फलंदाजील येत जबरदस्त ७८ धावांची खेळी केली. त्याला अखेर आर अश्विनने बाद करत इंग्लंडला मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले.

सॅम करन ही त्याची परदेशातील १०१वी विकेट्स ठरली. परदेशात किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो ५वा भारतीय फिरकीपटू ठरला. यापुर्वी हा पराक्रम अनिल कुंबळे, हरभजन सिंग, बिशनसिंग बेदी आणि भागवत चंद्रशेखर यांनी केला होता.

परदेशात २६ कसोटी सामन्यात त्याने ३१.२६च्या सरासरीने १०१ विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून एकूण ९ गोलंदाजांनी परदेशात १०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनचा असाही एक कारनामा- 

याच सामन्यात भारताच्या या फिरकीपटूने एक खास कारनामा केला. त्याने कसोटीत खेळताना परदेशी भूमीवर १०० विकेट्स आणि १००० धावांचा टप्पा पार केला. असे करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला. त्याने परदेशात २६ कसोटीत ३०.०८च्या सरासरीने १०५३ धावा तसेच ३१.२६च्या सरासरीने १०१ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अन्य खेळाडूंमध्ये अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि कपील देव यांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

एशियन गेम्स: 4×400 मीटर रिलेमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण तर पुरूषांना रौप्यपदक

एशियन गेम्स: भारताचा धावपटू जीन्सन जॉन्सनला पुरूषांच्या १५०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment