---Advertisement---

अखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच!

---Advertisement---

दुबई। 14 व्या एशिया कप स्पर्धेत आज (25 सप्टेंबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुपर फोरचा सामना सुरु आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारताकडून या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने 46 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने एक खास विक्रम करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

जडेजाने एशिया कपमध्ये वनडेत 19 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे तो एशिया कप स्पर्धेमध्ये वनडेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

हा पराक्रम करताना त्याने सचिनच्या 17 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. तसेच जडेजाने हा कारनामा एशिया कपमधील त्याच्या 13 व्या वनडे सामन्यात केला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आहे. त्याने 12 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत.

एशिया कप स्पर्धेमध्ये वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-

22 विकेट्स – इरफान पठाण (12 सामने)

19 विकेट्स – रविंद्र जडेजा (13 सामने)

17 विकेट्स – सचिन तेंडुलकर (23 सामने)

15 विकेट्स – कपिल देव (7 सामने)

14 विकेट्स – आर अश्विन (7 सामने)

महत्वाच्या बातम्या –

Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार

टीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण

एमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment