रविवारी (दि. 26 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात रंगला. ब्रेबॉर्न स्टेडिअमवरील या सामन्यात मुंबईची गोलंदाज हेली मॅथ्यूज हिने नाद पराक्रम गाजवला. या स्पर्धेत हेली सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज बनली. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याऱ्या टॉप 5 गोलंदाजांमध्ये मुंबईच्या महिलांनी जागा मिळवली. यात हेली अव्वलस्थानी राहिली.
अंतिम सामन्यात काढल्या तीन विकेट्स
दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या सपशेल चुकीचा ठरवला. मुंबईच्या गोलंदाजांनी या सामन्यात दिल्लीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. या सामन्यात दिल्लीने 20 षटकात 9 विकेट्सच्या मोबदल्यात 131 धावा केल्या. या 9 विकेट्समधील 3 विकेट्स या हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) हिने चटकावल्या. हेलीने 4 षटके गोलंदाजी करताना फक्त 5 धावा खर्च करत 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
https://twitter.com/mipaltan/status/1640016076443467777
स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स
हेलीने मुंबईच्या जेस जोनासन (2 धावा), मिन्नू मणी (1 धाव) आणि तानिया भाटिया (0 धाव) या फलंदाजांना बाद केले. या तीन विकेट्स काढताच हेली महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेत संयुक्तरीत्या सर्वाधिक विकेट्स घेणारी अव्वल गोलंदाज बनली. हेलीने 10 सामन्यात 202 धावा खर्च करत 5.94च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट्स नावावर केल्या. अंतिम सामन्यातीलच 5 धावा देत 3 विकेट्स ही तिची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.
हेलीव्यतिरिक्त सर्वाधिक विकेट्स काढण्याचा पराक्रम यूपी वॉरियर्झ संघाची सोफी एक्लेस्टोन (Sophie Ecclestone) हिने केला. सोफीनेही 9 सामन्यात 6.61च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट्स घेतल्या आहेत. 13 धावा देत 4 विकेट्स ही सोफीची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.
हेलीचा असाही विक्रम
विशेष म्हणजे, हेलीने अंतिम सामन्यात आणखी एक खास कारनामा केला. हेली या स्पर्धेत 2 निर्धाव षटके टाकणारी पहिली खेळाडू बनली. हेलीने अंतिम सामन्यातील 12वे षटक आणि 16वे षटक निर्धाव टाकले. त्यामुळे तिच्या नावावर 2 निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम नोंदवला गेला. (Most wickets In Women’s Premier League 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेने घडवला इतिहास! टी20 मध्ये पार केले 259 धावांचे आव्हान, डी कॉकचे वादळी शतक
Final : शिखा अन् राधाच्या झुंजार खेळीच्या जोरावर दिल्लीने पार केली शंभरी, मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान