सेंच्युरियन | पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला आज सुरुवात झाली. बाॅक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी आफ्रिकेचा महान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेट जगतात एक मोठा पराक्रम केला.
त्याने कसोटीत ४२२ विकेट्सचा टप्पा आज पार केला. त्याने ८९ कसोटी सामन्यात २२.६२च्या सरासरीने ४२२ विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ११व्या स्थानी आला आहे.
विशेष म्हणजे डेल स्टेन आता दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने माजी दिग्गज गोलंदाज शाॅन पोलाॅकचा ४२१ विकेट्सचाही विक्रम मोडला आहे.
यामुळे प्रत्येक देशाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीतही त्याचा समावेश झाला आहे.
प्रत्येक देशासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
८००- मुथय्या मुरलीधरन, श्रीलंका
७०८- शेन वार्न, ऑस्ट्रेलिया
६१९- अनिल कुंबळे, भारत
५६५- जेम्स अँडरसन, इंग्लंड
५१९- कर्टनी वाॅल्श, विंडीज
४३१- रिचर्ड हॅडली, न्यूझीलंड
४२२- डेल स्टेन, दक्षिण आफ्रिका
४१४- वसिम अक्रम, पाकिस्तान
२१६- हिथ स्ट्रीक, झिंबाब्वे
२०५- शाकिब अल हसन, बांगलादेश
६- टीम मुर्ताघ, आर्यलंड
३- यामिन अहमदाझायी, अफगाणिस्तान
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहलीच्या विराट खेळीने लक्ष्मणचा व्हेरी व्हेरी स्पेशल विक्रम मोडीत
–रिकी पाॅटिंगच्या देशात त्याच्या आवडत्या मैदानावरच विराट मोडला पाॅटिंगचा विक्रम
–८६ वर्षांत कोणत्याही भारतीयला न जमलेली गोष्ट मयांक अगरवालने पदार्पणातच केली
–जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम