---Advertisement---

‘कोरोनापासून क्रिकेटचा देव वाचला नाही तर तुम्ही आम्ही…’, या राज्याच्या मुख्यमंत्र्याने सचिनचे नाव घेत केला ट्विट

On: रविवार, मार्च 28, 2021 2:51 PM
---Advertisement---

‘क्रिकेटचा देव’ म्हणून संबोधला जाणारा दिग्गज भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी (27 मार्च) सकाळी त्याने स्वत: ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सचिनचे उदाहरण देत कोरोनापासून बचाव करण्यासासाठी लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

शिवराज यांनी ट्विटरवर लिहिले की, “क्रिकेटचा देव असणारा सचिन देखील कोरोनाच्या संसर्गापासून वाचू शकला नाही, तर मग तुम्ही-आम्ही कोण आहोत. म्हणून कृपया मास्क लावा आणि काळजी घ्या. कोविड-19 पासून स्वत:चे आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करा.”

याबरोबर मुख्यमंत्री शिवराज यांनी सचिन तेंडुलकरला कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शनिवारी सकाळी सचिन तेंडुलकरने ट्विट करताना सांगितले की, “तो सतत कोरोना चाचण्या करत होता आणि सर्व आवश्यक खबरदारी घेत होता. परंतु शनिवारी सकाळी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या घरात इतर सर्व लोकांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मी घरात स्वत: ला क्वारंटाईन केले आहे आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करत आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या-

अरेरे! विराटचा भिडू आंतरराष्ट्रीय पदापर्णात सपशेल फ्लॉप, पहिल्याच चेंडूवर झाला बोल्ड

तिसरी वनडे: तब्बल ९० सामने खेळलेल्या क्रिकेटपटूला टीम इंडियाने दाखला बाहेरचा रस्ता, जाणून घ्या भारताची प्लेइंग इलेव्हन

ऐकलंत का! सामन्यापुर्वी लेडीज परफ्यूम लावतो बेन स्टोक्स, कारण ऐकून खदखदून हसाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---