14 नोव्हेंबरपासून इंदोर येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना (First Test Match) इंदोरमध्ये पार पडणार आहे.
या कसोटी सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी आत्तापर्यंत 40% टक्के तिकीटांची विक्री झाली आहे.
‘भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी जवळपास 7000 तिकिटांची विक्री झाली आहे. उर्वरित 9000 तिकीटे विकली जातील अशी आशा आहे,’ असे मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) अध्यक्ष अभिलाष खांडेकर म्हणाले.
‘आम्ही हंगामातील तिकीटांच्या विक्रीसोबतच कसोटी सामन्याच्या दैनिक तिकीटांचीही विक्री करत आहोत,’ असे अभिलाष खांडेकर (Abhilash Khandekar) म्हणाले.
‘मध्यप्रदेशातील इंदोर (Indore) हे एक मोठे शहर आहे. या शहरातील होळकर क्रिकेट स्टेडियमची (Holkar Cricket Stadium) क्षमता ही 27000 प्रेक्षकांची आहे. परंतु, भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी जवळपास 16000 तिकीटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.’
‘स्टेडियममधील उर्वरित जागा आयोजक, बीसीसीआयचे प्रतिनिधी, मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य, माजी खेळाडू, प्रमुख सेलिब्रिटी, सरकारी अधिकारी इत्यादींसाठी आरक्षित करण्यात आली आहे,’ असे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
3 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑनलाईन तिकीटांची विक्री सुरू झाली होती. उर्वरित तिकीट विक्रीची प्रक्रिया 10 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होईल, असेही अधिकाऱ्यानी सांगितले आहे.
इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये होणाऱ्या पाच दिवसाच्या कसोटी सामन्यासाठी वेगवेगळ्या श्रेणीतील तिकीटांचे दर 315 ते 1845 रुपयांदरम्यान आहेत.
इंदोरमधील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर भारत-बांगलादेश संघात 22 नोव्हेंबरपासून कोलकाताला दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
https://twitter.com/Maha_Sports/status/1192391128902799360






