महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023चा दुसरा क्वॉलिफायर सामना बुधवारी (28 जून) पुण्यातील एमसीएस स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स संघ आमने-सामने होते. कोल्हापूरने हा सामना 5 विकेट्सने जिंकला आणि अंतिम सामन्यात धडक दिली. अंतिम सामन्यात आता कोल्हापूर संघापुढे रत्नागिरी जेट्सचे आव्हान असेल.
पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर कोल्हापूरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पुणे संघाने 20 षटकांमध्ये 7 बाद 133 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोल्हापूर संघाने 134 धावांचे हे लक्ष्य 17.4 षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले. मध्यक्रमातील सिद्धार्थ म्हात्रे (Siddharth Mhatre) याने कोल्हापूर संघासाठी 58 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तर अक्षय दरेकर 29 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या.
कोल्हापूरच्या आक्रमक गोलंदाजीपुढे पुणेरी बाप्पा संघाची वरची फळी सपशेल अयशस्वी ठरली. पुण्याचा सलामवीर पवन शहा 5 धावांवर कोल्हापूरच्या आत्मन पोरेने पायचीत बाद केले व पुण्याला पहिला धक्का दिला. शुभम तैस्वाल 14 चेंडूत 18 धावा करून तंबूत परतला. कोल्हापूरच्या निहाल तुसमदने त्याला झेल बाद केले. त्याने तीन चौकार मारले. त्यानंतर कर्णधार रोहन दामले (9 धावा), यश क्षीरसागर (6 धावा) यांना तरणजीत ढिलोनने त्रिफळा बाद करून पुणेरी बाप्पा संघाला अडचणीत टाकले. कोल्हापूरचा फिरकीपटू अक्षय दरेकर (3/29) च्या भेदक गोलंदाजीपुढे मधल्या फळीतील फलंदाज हर्ष सांघवी (17 धावा), अद्वैय शिधये (4 धावा), अजय बोरुडे (0 धाव) हे देखील झटपट बाद झाले. त्यामुळे पुणेरी बाप्पा संघ 14 षटकात 7 बाद 68 अशा बिकट स्थितीत सापडला.
नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अभिमन्यु जाधवने चौफेर फटकेबाजी करत 21 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अभिमन्युने 3 चौकार व 3 षटकार मारले. त्याला सुरज शिंदेने 21 चेंडूत 26 धावांची खेळी करून साथ दिली. या जोडीने आठव्या विकेटसाठी 36 चेंडूत 65 धावांची भागीदारी करून संघाला निर्धारित षटकात 7 बाद 133 धावांचे आव्हान उभे करून दिले. कोल्हापूरकडून अक्षय दरेकर 3/29, तरणजीत ढिलोन(2/20), आत्मन पोरे(1/8), निहाल तुसमद 1/13) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
134 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या कोल्हापूर टस्कर्स संघाने हे आव्हान 17.4 षटकात 5 बाद 134 धावा काढून पूर्ण केले. कोल्हापूरच्या केदार जाधव(5 धावा)ला पुण्याच्या सचिन भोसलेने पायचीत बाद करून पहिला झटका दिला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अंकित बावणे(5 धावा), किर्तीराज वाडेकर(0 धाव) यांना सचिन भोसले झटपट बाद करून कोल्हापूर टस्कर्सला अडचणीत टाकले. त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रेने 41 चेंडूत 58 धावा करून अर्धशतक पूर्ण केले. त्यात त्याने 6 चौकार व 2 षटकार मारले. एकाबाजूने विकेट पडत असताना सिद्धार्थने आक्रमक फलंदाजी कायम ठेवत धावफलक हालता ठेवला. सिद्धार्थला नौशाद शेखने 24 धावा काढून साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 34 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. नौशाद शेख रोहन दामलेच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. सिद्धार्थने तरणजीत ढिलोनच्या साथीत 29 चेंडूत 23 धावांची भागीदारी करून धावगतीला वेग दिला. तरणजीत 10 धावांवर बाद झाला.
सिद्धार्थ म्हात्रे व साहिल औताडे(नाबाद 24 धावा) या जोडीने 27 चेंडूत 53 धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला. सिद्धार्थ म्हात्रेने विजयी षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
निकाल:
पुणेरी बाप्पा: 20 षटकात 7 बाद 133 धावा (अभिमन्यू जाधव नाबाद 42 (21, 3×4, 3×6), सुरज शिंदे नाबाद 26 (21, 1×6), हर्ष सांघवी 17, शुभम तैस्वाल 18, अक्षय दरेकर 3/29, तरणजीत ढिलोन 2/20, आत्मन पोरे 1/8, निहाल तुसमद 1/13) पराभुत वि.कोल्हापूर टस्कर्स: 17.4 षटकात 5 बाद 134 धावा (सिद्धार्थ म्हात्रे नाबाद 58 (41, 6×4, 2×6), साहिल औताडे नाबाद 24 (14, 2×4, 1×6), नौशाद शेख 24 (23, 1×4), सचिन भोसले 3/33, रोहन दामले 1/17, अजय बोरुडे 1/37); सामनावीर – सिद्धार्थ म्हात्रे; कोल्हापूर टस्कर्स संघ 5 गडी राखून विजयी. (MPL 2023 Kolhapur Tuskers won by 5 wickets in Qualifier 2)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
बुमराह कधी करणार पुरनागमन? विश्वचषकाचे वेळापत्रक येताच समोर आली मोठी अपडेट
आंदोलकांवर भारी पडला जॉनी बेअरस्टो! उचलून थेट नेले मैदानाबाहेर, लॉर्ड्स कसोटीत गोंधळ