---Advertisement---

MPL प्ले ऑफ्ससाठी नवी नियमावली! पावसाने खेळ खराब करू नये म्हणून एमसीएची खबरदारी

On: सोमवार, जून 26, 2023 1:03 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 चे प्ले ऑफ सामने सोमवारी (26 जून) रोजी सुरू होतील. पंधरा साखळी सामन्यांच्या समाप्तीनंतर प्ले ऑफ्स खेळणारे चार संघ निश्चित झाले असून, या संघांमध्ये पुढील सामने पार पडतील. मात्र, या सामन्यांसाठी एमसीएने नवी नियमावली जाहीर केली आहे.

साखळी फेरीत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या रत्नागिरी जेट्स व दुसऱ्या क्रमांकावरील कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान सोमवारी क्वालिफायर एकचा सामना खेळला जाईल. तर, एलिमिनेटर सामन्यात तिसऱ्या क्रमांकावरील ईगल नाशिक टायटन्स व चौथ्या क्रमांकावरील पुणेरी बाप्पा संघ भेटतील. त्यानंतर क्वालिफायर दोन व अंतिम सामना खेळला जाईल.

या चार सामन्यांवर पावसाचे सावट आहे. त्यासाठी एमसीएने खास नियमावली जाहीर केली. प्रत्येक सामन्यासाठी दोन तासांचा राखीव कालावधी वाढवण्यात आला आहे. जेणेकरून षटकांमध्ये कपात होणार नाही. राखीव कालावधी बाहेर सामना गेल्यास प्रत्येकी 4 मिनिटे 25 सेकंदानंतर एका षटकाची कपात केली जाईल. सामना कमीत कमी पाच षटकांचा करण्याचा प्रयत्न असेल.

पाच षटकांचाही खेळ न झाल्यास सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लावण्यात येईल. सुपर ओव्हर देखील शक्य न झाल्यास सामना दुसऱ्या दिवशी ठेवलेल्या राखीव वेळेत जाईल. हि राखीव वेळ सकाळी नऊ व दुपारी दोन अशी आहे. एकदा सुरू होऊन बंद झालेला सामना त्यानंतर ज्या ठिकाणी बंद झाला तिथून पुढे चालू करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत सामना सुरूच झाला नाही तर जो संघ गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर होता त्या संघाला विजयी घोषित केले जाईल.

सध्या पुणे येथे जोरदार पाऊस सुरू असल्याने पावसाचे सावट या सामन्यांवर असेल. त्या दृष्टीनेच या नियमांची आखणी करण्यात आली आहे.

(MPL 2023 Playing Conditions And Rules For Play Offs And Final)

महत्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरुजींनी सुचवले टीम इंडियाचे नवे कॉम्बिनेशन! म्हणाले, “ते दोन जण संघात हवेत” 
यशस्वीचा राजस्थान रॉयल्सविषयी मोठा खुलासा! म्हणाला, “त्यांनी फक्त मला संधीच दिली नाही तर,…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---