पुणे। महाराष्ट्र प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात विजय पावले (3-33), कुणाल थोरात (2-16) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजी सह तुषार श्रीवास्तव (44 धावा) याने केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने सोलापूर रॉयल्स संघाविरुद्ध 5 गडी राखून विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी यशस्वी ठरविला. प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत आजचा दिवस गाजवला. प्रथम फलंदाजी करताना सामन्यात सोलापूर संघ 3.3 षटकात बिनबाद 25 अशी धावसंख्या असताना सलामीचा फलदांज यश नाहर (14 धावा) याला रत्नागिरीच्या डावखुरा फिरकीपटू कुणाल थोरातने यष्टीचीत केले. त्यानंतर प्रविण दिशेट्टी (नाबाद 38) व रिषभ राठोड (नाबाद 11) सोलापूर संघ 12.1 षटकात 3 बाद 82 अशा स्थितीत असताना पाऊस सुरु झाला व त्यामुळे खेळ थांबविण्यात आला.
त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज रिषभ राठोडने 28 चेंडूत 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 43 धावा, अथर्व काळेने 25 धावा काढून संघाला 145 धावांचे आव्हान उभे केले.
याच्या उत्तरात रत्नागिरी जेट्स संघाने हे आव्हान 17.2 षटकात 5 बाद 147धावा करुन हे आव्हान पूर्ण केले. यात तुषार श्रीवास्तवने 38 चेंडूत 3चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 44 धावा, तर रोहित पाटीलने 31 चेंडूत 3 चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 36 धावांची खेळी करुन या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 47 चेंडूत 62 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यानंतर निखिल नाईकने नाबाद 19, दिव्यांग हिंगणेकरने नाबाद 2 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी ठरला. (Ratnagiri Jets ease past Solapur Royals at Maharashtra Premier League 2023)
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
सोलापूर रॉयल्स- 20 षटकात 7 बाद 145 धावा
(रिषभ राठोड नाबाद 43(28,3×4,1×6), प्रवीण दिशेट्टी 39(36,6×4),अथर्व काळे 25(14), विजय पावले 3-33, कुणाल थोरात 2-16)
रत्नागिरी जेट्स- 17.2 षटकात 5 बाद 147 धावा
(तुषार श्रीवास्तव 44(38,3×4,2×6), रोहीत पाटील 36(31,3×4,2×6), निखिल नाईक नाबाद 19(9,2×4), दिव्यांग हिंगणेकर नाबाद 2, यश बोरकर 1-10, ओमकार राजपूत 1-31, सत्यजीत बच्चाव 1-33); सामनावीर – कुणाल थोरात, रत्नागिरी जेट्स संघ 5 गडी राखून विजयी)
महत्वाच्या बातम्या-
MPL स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्सची विजयी सलामी, अर्शिन कुलकर्णीची जबरदस्त फिफ्टी
W,W,W,W,W,W : ‘या’ गोलंदाजाने 6 चेंडूत घेतल्या सलग 6 विकेट्स, एकाच षटकात डबल हॅट्रिक घेऊन रचला इतिहास