---Advertisement---

BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद

On: शनिवार, जून 10, 2023 2:31 PM
---Advertisement---

प्रथमच आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. या लिलावात सहा फ्रेंचाईजींनी भाग घेतला. या सहा संघाने मिळून तब्बल 128 खेळाडूंवर बोली लावली. यामध्ये अनेक युवा तसेच अनुभवी खेळाडूंचा समावेश होता. त्याचवेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सोलापूर रॉयल्स या संघाने आपले मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचे महान वेगवान गोलंदाज चमिंडा वास यांची नियुक्ती केली आहे.

https://www.instagram.com/p/CtMn7vosNt4/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

 

प्रदीर्घ कालावधीनंतर एमपीएलचा हंगाम पुन्हा एकदा सुरू होत आहे. कपिल सन्स एक्स्प्लॉजिव यांनी 7 कोटी रुपयांमध्ये सोलापूर फ्रॅंचाईजी आपल्या नावे केली होती. या फ्रॅंचाईजीला आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे देखील पाठबळ आहे. सोलापूर संघाने युवा फिरकीपटू विकी ओस्तवाल याला आपला आयकॉन खेळाडू म्हणून जाहीर केले होते.

खेळाडूंच्या लिलावात त्यांनी 20 खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतले. सत्यजित बच्छाव, यश नाहर, स्वप्निल फुलपगार व विशांत मोरे असे महाराष्ट्र राज्य संघातील खेळाडू देखील या संघात सामील आहेत. त्याचवेळी आता संघाने आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकांची घोषणा केली आहे.

श्रीलंकेचे सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज चमिंडा वास या संघाला प्रशिक्षण देणार आहेत. संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून याबाबत घोषणा करण्यात आली. वास यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्द तब्बल 755 बळी टिपले आहेत. तसेच श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाचे देखील ते प्रशिक्षक होते.

सोलापूर रॉयल्स संघ पुढीलप्रमाणे –

विकी ओस्तवाल, सत्यजित बच्छाव, ओमकार राजपूत, हर्षवर्धन टिंगरे, सुनील यादव, यश बोरकर, प्रथमेश गावडे, प्रणय सिंग, अंश धूत, प्रतीक म्हात्रे, संकेत फराटे, प्रवीण देशेट्टी, अथर्व काळे, यश नहार, मेहुल पटेल, यासर शेख, देव दी नाटू, अभिनव भट, स्वप्निल फुलपगार, विशांत मोरे, रिषभ राठोड.

(MPL 2023 Solapur Royals Appointed Srilanka Legend Chaminda Vaas As A Headcoach)

महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य” 
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---