महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 रोमांचक मोड मध्ये पोहोचला आहे. ज्यामध्ये आजचा सामना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यात झाला. कोल्हापूरने टॉस हरल्यानंतर पहिले फलंदाजी केली. त्यांच्या डावाची सुरुवात खूप खराब झाली. 10 षटकांतच त्यांनी 5 विकेट्स गमावल्या. संघ 107/9 अशा कठीण स्थितीत असताना आनंद ठेंगेने शेवटच्या षटकात 27 धावा काढत फटकेबाजी केली. त्याच्या 20 चेंडूत 35 धावांच्या जोरावर कोल्हापूरने 134 धावांपर्यंत मजल मारली. श्रीकांत मुंढेनेही 27 धावा केल्या. या दोघांशिवाय कोणलाही समाधान कारक कामगिरी करता आली नाही.
कोल्हापूरची सलामी जोडी आपल्या विस्फोटक खेळीसाठी जाणली जाते पण या सामन्यात नाशिकच्या गोलंदाजांनी दोघांनाही स्वस्तात पॅव्हिलियन मध्ये परतले. अंकित बावणे (11) तर राहुल त्रिपाठीने 15 धावा केल्या. हे दोघेही सपेशल फ्लाॅप ठरले.
नाशिकच्या गोलंदाजांनी छान कामगिरी केली. प्रशांत सोलंकीने 4 षटकांत 13 धावा देत 4 बळी घेतले. अर्शिन कुलकर्णीने 2 विकेट्स घेतल्या.
नाशिकला विजयासाठी 135 धावांची गरज होती. त्यांच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच चांगली खेळी केली. रोहन दामलेने 28 चेंडूत 45 धावा केल्या आणि अर्शिन कुलकर्णीने 34 चेंडूत 42 धावा करत नाशिकला विजय मिळवून दिला. त्यांनी 16.2 षटकांत 6 विकेट्स गमावून 138 धावा केल्या. तत्तपूर्वी मंदार भंडारी पहिल्याच षटकात 4 धावांवर बाद झालेला.
कोल्हापूरकडून रजनीश गुरबानीने 4 बळी घेतले, पण इतर गोलंदाज प्रभाव टाकू शकले नाहीत. नाशिकचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला. प्रशांत सोलंकीच्या नेतृत्वाखाली संघाने या हंगामी शानदार सुरुवात केली आहे.






