---Advertisement---

MPL 2025: पुणेरी बाप्पाचा पत्ता कट, राॅयल्सचा फायनलमध्ये दणदणीत प्रवेश!

On: रविवार, जून 22, 2025 10:31 AM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मधील क्वालिफायर 2 सामन्यात रायगड रॉयल्सने पुणेरी बाप्पावर 25 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. एलिमिनेटर सामन्यामध्ये राॅयगड राॅयल्स संघाने कोल्हापूर टस्कर्सला मात देऊन क्वालिफायर 2 मध्ये दणदणीत प्रवेश मिळवला होता. पुणेरी बाप्पाने क्वालिफायर 1 मध्ये ईगल नाशिक टायटन्सकडून पराभव पत्करले होते.

या सामन्यात रायगड रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 133 धावा केल्या. ज्यामध्ये सिध्देश वीरने दमदार 42 धावांची खेळी केली (40 चेंडू), तर ओंकार खाटपेने 21 धावा (24 चेंडू) केल्या. या दोघांशिवाय संघातील कोणत्याही खेळाडूला विशेष कामगिरी करता आली नाही. कर्णधार रिषभ राठोडने केवळ 5 धावा केल्या. सामन्यामध्ये पुणेरी बाप्पाच्या गोलंदाजांनी खास कामगिरी करत राॅयल्सना 133 धावांवर रोखले, संघातील सर्व खेळाडूंनी निदान एक विकेट तर घेतली, शिवाय रामकृष्ण घोषने 4 षटकांत 25 धावा देत 2 बळी घेतले. निकिल धुमाळनेही 2 बळी घेत 39 धावा दिल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना पुणेरी बाप्पा संघााने खराब सुरुवात केली. संघाने 7 षटकात 45 धावांत 3 विकेट्स गमावल्या ज्यामुळे रायगड राॅयल्स संघाला आत्मविश्वास मिळाला. ज्यामुळे त्यांनी सातत्याने विकेट्स मिळवल्या. पुण्याच्या कोणत्याही फलंदाजांला मोठी कामगिरी करता आली नाही. संघाकडून ऋषिकेश सोनवणेने सर्वाधिक 30 चेंडूत 30 धावा केल्या, तर सुरज शिंदेने 22 धावा केल्या. त्यांची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. संघाने 18.5 षटकांत सर्व गडी गमावून 108 धावा केल्या.

राॅयल्सकडून निखिल कदमने 3.5 षटकांत 32 धावा देत 3 बळी घेतले. विकी ओत्सवालने मॅजिक स्पेल टाकला. त्याने 4 षटकांत फक्त 16 धावा देत त्याने 2 महत्त्वाचे बळी घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---