सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढत आहे. अशात, आंतरराष्ट्रीय-देशांतर्गत अशा सर्व प्रकारचे क्रिकेट रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहे. बीसीसीआयने इंडियन प्रिमीयर लीगही (आयपीएल) अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे.
कोविड १९मुळे अनेक लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याला क्रिकेटपटूही अपवाद नाहीत. जरी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना याचा फटका बसला नसला. तरी, असे बरेच खेळाडू होते, जे देशांतर्गत लीग खेळून आपले घर चालवत होते. आणि आता या देशांतर्गत लीग रद्द झाल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.
असचं काहीस घडलं आहे, २३ वर्षांखालील मुंबई संघाकडून खेळणारा क्रिकेटपटू सलमान खानसोबत. आर्थिक स्थितीमुळे तो त्याच्या कुंटुंबासोबत चक्क तंबूमध्ये राहत आहे. Mpl player salman khan is forced to live in tents due to corona virus.
२१ वर्षीय सलमान हा मुंबईच्या क्रॉस मैदानाजवळ असणाऱ्या एका तंबूत सहकुटुंब राहत आहे. त्याचे वडील ग्राउंड्स मॅन आहेत, जे क्लब आणि कॅम्पमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये काम करून पैसे कमावतात. पण, कोरोना व्हायरसमुळे त्यांना आता कोणतेच काम मिळत नाही.
सलमानने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, “तो यावर्षी मुंबई प्रिमीयर लीगमधील आकाश टायगर्स संघाकडून खेळणार होता. यासाठी त्याला १ लाख रुपये मिळणार होते. म्हणून त्याने विचार केला होता की, पैसे मिळाल्यानंतर तो भाड्याच्या घरात राहणार होता. पण आता ते शक्य नाही.”
तसेच युवा फिरकी गोलंदाज सलमान म्हणाला, “जर एमपीएल झाले असते तर मी माझ्या कुटुंबासोबत भाड्याच्या घरी राहायला गेलो असतो. पण या महामारीने सगळ काही नष्ट केलं. माझ्याकडे आता दुसरी कोणती नोकरीही नाही आणि माझे उरलेले पैसेसुद्धा संपत आले आहेत.”
सलमानने २०१६ला गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १२ प्रथम श्रेणी सामने खेळत ५४० धावा आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
पुण्यातील क्रिकेट म्युझियमने विकत घेतली पाकिस्तानच्या या खेळाडूची ऐतिहासिक बॅट
‘गांगुलीने युवा खेळाडूंसाठी खूप काही केले, पण धोनीने काय…
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणतो टॉस हरलो की खेळाडू देतात…