महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग( एमपीएल 2023) स्पर्धेत सोमवारी क्वालिफायर एक सामना खेळण्यात आला. गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. पावसामुळे प्रत्येकी 15 षटकांच्या केलेल्या या सामन्यात रत्नागिरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 136 धावा केल्या. त्याला उत्तर देताना कोल्हापूर संघाने बिनबाद 18 अशी मजल मारली होती. उर्वरित सामना मंगळवारी (27 जून) सकाळी नऊ वाजता खेळला जाईल.
https://www.instagram.com/p/Ct92KUKP06s/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
गहुंजे येथे झालेल्या या सामन्याला सुरू होण्यास निर्धारित वेळेपेक्षा दीड तास उशीर झाला. कोल्हापूरचा कर्णधार केदार जाधव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रत्नागिरी संघाची सुरुवात झाली व त्यांचा सलामीवीर सोनवणे हा झटपट बाद झाला. कर्णधार काझी व प्रीतम पाटील हे देखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. धीरज फटांगरे व किरण चोरमले यांनी भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धीरजने 46 धावांची खेळी केली दहाव्या षटकानंतर पुन्हा पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा केला गेला. कोल्हापूरचा इतर फलंदाजांना यानंतर धावांचा वेग न वाढवता आल्याने ते 136 पर्यंत पोहोचू शकले.
या धावांचा पाठलाग करताना कोल्हापूर संघाने सलामी वीर केदार जाधव व अंकित बावणे यांच्या योगदानामुळे 1.5 षटकात 18 अशी मजल मारलेली. हा पूर्ण सामना मंगळवारी सकाळी पूर्ण केला जाईल.
(MPL Qualifier 1 Kolhapur Tuskers Vs Ratnagiri Jets Match Stopped Due To Rain Matche Resume Tuesday Morning)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ 12 शहरात खेळले जाणार वनडे विश्वचषक 2023चे सर्व सामने, एका क्लिकवर घ्या जाणून
केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा