वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी आजी-माजी खेळाडू विजेता बनणाऱ्या संघांविषयी भविष्यवाणी करताना दिसत आहेत. काहींनी स्पर्धेतील अंतिम सामना खेळणाऱ्या संघांविषयी भाष्य केले आहे, तर काहींनी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबाबत भविष्यवाणी केली आहे. अशात दक्षिण आफ्रिका संघाचा माजी विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स याने सांगितले आहे की, अशी कोणती गोष्ट आहे, जी एका खेळाडूला महान बनवते.
‘मिस्टर 360’ म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारत लिहिले की, “तुझ्या मते, एका क्रिकेटपटूला कोणती गोष्ट महान बनवते? आयसीसी किताब जिंकणे की, लोकांचे प्रेम कमावणे आणि खेळाचा आनंद लुटणे?” हा प्रश्न वाचताच डिविलियर्सच्या चेहऱ्यावर हास्य आले.
त्याने या प्रश्नाचे उत्तर देताना डिविलियर्सने भारतीय संघाचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यांचीही नावे घेतली. त्याने सांगितले की, “मी कधीही विश्वचषक जिंकलो नाहीये. आजच्या काळात लोक विसरले आहेत की, क्रिकेट एक संघ आहे. मी नेहमी ट्विटर आणि सोशल मीडियावर पाहतो, लोक म्हणतात याने विश्वचषक जिंकला, त्याने जिंकला. एमएस धोनी याने विश्वचषक जिंकला नव्हता, भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. हे आपल्या डोक्यात ठेवा आणि विसरू नका. 2019मध्ये लॉर्ड्समध्ये बेन स्टोक्सने ट्रॉफी उंचावली नव्हती, तर इंग्लंडने ट्रॉफी जिंकली होती. एक संघ जेव्हा विश्वचषक जिंकतो, तेव्हा त्यामध्ये खेळाडूंसोबतच सपोर्ट स्टाफ, निवडकर्ते, बोर्डाचे अधिकारी आणि राखीव खेळाडूंचे योगदान असते.”
https://twitter.com/CoverDrive001/status/1706217689675616609?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1706217689675616609%7Ctwgr%5E0ecc2b96b3d80bfac7e3ca810d5f3dc49397c622%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fnews-watch-ab-de-villiers-gave-an-important-reaction-on-winning-the-icc-title-ms-dhoni
स्पर्धेला कधीपासून सुरुवात
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेची सुरुवात येत्या 5 ऑक्टोबरपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्याने होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. चाहत्यांसोबतच माजी खेळाडूही या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. (mr 360 ab de villiers gave an important reaction on winning the icc title ms dhoni)
महत्त्वाच्या बातम्या-
सजवलेल्या बसमधून निघणार World Cup Trophyची पुण्यात भव्य रॅली; कधी, कुठे आणि कशी जाणार? घ्या जाणून
बोंबला! पोलिसांनी कापलं बाबर आझमचं चलन, ठोठावला दंड; पाकिस्तानी कर्णधाराने काय चूक केली वाचाच