---Advertisement---

आता बास झालं! सूर्याच्या बॅटमधून पडणार धावांचा पाऊस; खुद्द ‘मिस्टर 360’ने दिलाय पठ्ठ्याला सल्ला

On: गुरूवार, एप्रिल 6, 2023 6:30 PM
Suryakumar-Yadav-And-AB-De-Villiers
---Advertisement---

पाच वेळा इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स होय. मात्र, या संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वी त्याने भारतीय संघाकडून वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारात अनेक सामने खेळले, परंतु तो सपशेल फ्लॉप ठरला. त्यानंतर आता आयपीएल सुरू झाली आहे. यामध्येही त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त 15 धावा करता आल्या. अशात खराब फॉर्ममधून जाणाऱ्या सूर्यकुमार यादवला एबी डिविलियर्सने सल्ला दिला आहे.

Paisa-Pani

एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सूर्याला सल्ला देत म्हटले आहे की, त्याने कोणताही बदल न करता त्याच्या जुन्या योजनेवरच टिकून राहावे.

सूर्यकुमार यादवला डिविलियर्सचा सल्ला
शनिवारी (दि. 8 एप्रिल) मुंबई इंडियन्स संघाला त्यांचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी डिविलियर्सने सूर्याला सल्ला (AB De Villiers Advice To Suryakumar Yadav) दिला आहे. जिओ सिनेमावर बोलताना तो म्हणाला की, “सूर्यकुमार यादव सध्या त्या फेजमध्ये आहे, जिथे त्याला काहीच करण्याची गरज नाहीये. मात्र, त्याने हादरून न जाता आपल्या खेळण्याच्या योजनेत कोणताही बदल करायचा नाहीये. इतक्या वर्षांपासून तो ज्याप्रमाणे खेळत होता, त्याने तसेच खेळले पाहिजे.”

खरं तर, सूर्यकुमार ज्याप्रकारे शॉट खेळतो, त्यामुळेच चाहते त्याला एबी डिविलियर्सप्रमाणे ‘मिस्टर 360’ म्हणत आहेत. दुसरीकडे नुकतीच या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांची भेटही घेतली होती.

https://www.instagram.com/p/CqiUI4IydxK/?utm_source=ig_embed&ig_rid=f0d87c9f-5faa-4889-b8d2-4013ac945f8f

सूर्यकुमारने मागील हंगामात मुंबई इंडियन्स संघासाठी दमदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे संघाला या हंगामातही त्याच्याकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, पहिल्या हंगामात त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. आता दुसऱ्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. (mr 360 ab de villiers give big advice to suryakumar yadav ipl 2023 know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डिविलियर्सने पुन्हा दुखावली RCBच्या चाहत्यांची मने! म्हणाला, ‘हा’ संघच बनणार IPL 2023चा चॅम्पियन
‘आजचा सामना…’, केकेआर-आरसीबी सामन्याच्या काही तासांपूर्वीच भारताच्या माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---