भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी(18 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता केली आहे. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने सलग तीन अर्धशतके करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळला आहे. तसेच त्याचे सर्वांनीच कौतुक केले आहे. पण अजूनही क्रिकेट वर्तुळात धोनी हा सर्वोत्तम फिनिशर आहे की नाही यावर चर्चा सुरु आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी वनडेमध्ये धोनी सर्वोत्तम फिनिशर असल्याचे म्हटले आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोच्या स्तंभात चॅपेल यांनी लिहिले आहे की ‘सामना जिंकून देण्यासाठी धोनीसारखी ताकद कोणामध्येही नाही. मी अनेकदा विचार करतो की त्याने यावेळी खूप उशीर केला आहे. पण त्यावेळी तो नेहमी ताकदवान फटके मारुन भारताला रोमांचकारी विजय मिळवून देतो आणि आश्चर्यचकीत करतो.’
याबरोबरच चॅपेल यांनी धोनीची तूलना दिग्गज फिनीशर मायकेल बेवन यांच्याशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘बेवन हे सामना चौकाराने संपवायचे तर धोनी षटकाराने संपवतो. त्याचबरोबर धोनी हा वयाच्या 37 व्या वर्षीही एकेरी आणि दुहेरी धावा घेण्यात चपळ आहे. बेवन हे देखील यामध्ये चपळ होते.’
‘बॅटमध्ये आलेल्या अधूनिकतेमुळे आणि टी20 खेळण्याचा फायदा मिळाल्याने धोनी हा बेवनपेक्षा आकडेवारीनुसार सर्वोत्तम असेल. पण धोनी हा सर्वोत्तम फिनीशर आहे यात वाद नाही.’
‘त्याने ऍडलेड ओव्हल मैदानावर ऑन ड्राइव्हला मारलेला त्याचा ट्रडमार्क षटकार हेच सिद्ध करतो.’
याबरोबरच चॅपेल यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा महान फलंदाज व्हिव रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर यांना मागे टाकेल असे म्हटले आहे. तसेच ते असेही म्हणाले की विराट हा त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी ‘वनडे क्रिकेटचा डॉन ब्रॅडमन असेल.’
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर
–तब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक
–Video: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…