---Advertisement---

आयपीएल आता आयआयटीच्या परिक्षेत! धोनीने काय निर्णय घ्यावा, असा विद्यार्थ्यांना प्रश्न…

On: मंगळवार, मे 7, 2019 8:55 PM
---Advertisement---

आयपीएल 2019मध्ये आजपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मधील क्वालिफायर 1च्या सामन्यांने प्लेऑफच्या फेरीला सुरुवात झाली आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होत आहे.

आयपीएल ही जगभरातील लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक आहे. याचाच प्रत्यच मद्रास आयआयटीच्या परिक्षेदरम्यान आला आहे.

त्यांच्या ‘मटेरियल अँड एनर्जी बॅलन्स’ या विषयाच्या पेपरमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने क्वालिफायर 1 मध्ये जर नाणेफेक जिंकली तर काय निर्णय घ्यावा असा प्रश्न विचारला होता. यावेळी या प्रश्नामध्ये चेन्नईमधील हवामान अंदाज, तापमान, आर्द्रता पातळी याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्याचा विचार करुन विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचे होते.

या प्रश्नाचा फोटो आयसीसीने ट्विटरवर शेअर केला होता. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये प्रश्न विचारला होता की ‘कोणी धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सला निर्णय घेण्यात मदत करणार का?’ त्याचबरोबर आयसीसीने हा प्रश्न प्राध्यापक विग्नेश मुथुविजयन यांनी टाकल्याचेही सांगितले आहे.

मद्रास आयआयटीच्या मटेरियल अँड एनर्जी बॅलन्स या विषयाच्या पेपरमध्ये असा विचारला आहे हा प्रश्न – 

‘दिवस-रात्र सामन्यात दव महत्त्वाची भूमीका निभावते. मैदानात जर जास्त दव पडले तर चेंडू ओला होतो. त्यामुळे फिरकी गोलंदाजांपूढे मोठे आव्हान असते. चेंडू ओला झाला तर ग्रीप नीट पकडता येत नाही. त्यामुळे जर चेंडू नीट पकडता आला नाही तर नीट वळणारही नाही. तसेच वेगवान गोलंदाजांसाठी ओल्या चेंडूमुळे लेन्थची समस्या असते. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे नुकसान होते.’

‘आयपीएल 2019 मध्ये 7 मे ला चेपॉक स्टेडियमवर(एमए चिदंबरम स्टेडियम) चेन्नई सुपर किंग्स पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे. तिथे साधारण 70टक्के आद्रता असेल. तसेच सामन्याच्या सुरुवातीला 39 डीग्री तापमान असणार आहे. तर दुसऱ्या डावाच्या वेळी हे तापमान 27 डीग्री असणार आहे. या माहितीनंतर धोनीने जर नाणेफेक जिंकली तर त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घ्यावा की गोलंदाजीचा? स्पष्ट करा. योग्य स्पष्टीकरणाशिवाय गुण दिले जाणार नाही.’

महत्त्वाच्या बातम्या –

दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, २०१९ विश्वचषकाला मुकणार हा वेगवान गोलंदाज

स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून पुनरागमन करत एका हाताने घेतला शानदार झेल, पहा व्हिडिओ

सनरायझर्स हैद्राबादच्या चाहत्यांनी असे मजेदार ट्विट करत मानले मुंबई इंडियन्सचे आभार…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment