---Advertisement---

ऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली

On: बुधवार, जानेवारी 16, 2019 7:29 PM
---Advertisement---

ऍडलेड। भारताने काल(15 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारताच्या या विजयात  कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी तर एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.

धोनीने या सामन्यात 54 चेंडूत 101.85 च्या सरासरीने नाबाद 55 धावा केल्या. त्याने या खेळीत 2 षटकार मारले तसेच कोहलीबरोबर चौथ्या विकेटसाठी 82 धावांची आणि कार्तिकबरोबर पाचव्या विकेटसाठी नाबाद 57 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.

धोनी या खेळी दरम्यान कार्तिकबरोबर फलंदाजी करत असताना थकवा आल्याने मैदानावर काही वेळासाठी बसला होता. या सामन्यादरम्यान प्रचंड उष्णता असल्याने आणि विराट, कार्तिकबरोबर भागीदारी करताना एकेरी-दुहेरी धावांवर जास्त भर देत असल्याने त्याला हा थकवा जाणवला होता.

मात्र त्याचा मैदानावर खाली बसलेला फोटो ऑस्ट्रेलियाच्या एका नामांकित मीडियाने पोस्ट करत म्हटले आहे की ‘एमएस धोनी उभाही राहू शतक नाही.’

यावर भारतीय क्रिकेटचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या पोस्टवर कमेंट करत ऑस्ट्रेलियाच्या मीडिया हाऊसला सुनावले आहे.

https://twitter.com/lucky_rae/status/1085175324210393088

https://twitter.com/nagprakash/status/1085141726833139712

https://twitter.com/debapriyo_tweet/status/1085147175196086273

https://twitter.com/Minitin/status/1085263809835495425

https://twitter.com/Jamirmanen1/status/1085182829397307393

https://twitter.com/Krushnaal/status/1085175647733833729

धोनीने या सामन्यात भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत भारताचा विजयही निश्चित केला होता. तर धोनीने दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढत भारताला या सामन्यात विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment