कार्डीफ। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आज, ६ जुलैला दुसरा टी२० सामना होणार आहे. या सामन्यात जर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला ११ जणांच्या संघात संधी मिळाली तर त्याच्यासाठी हा सामना खास ठरणार आहे.
धोनीने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४९९ सामने खेळले असुन आज भारतीय संघात संधी मिळाली तर हा सामना त्याचा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे.
भारताच्या आत्तापर्यंत फक्त सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड या खेळाडूंनी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे धोनी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारताचा तिसराच क्रिकेटपटू ठरणार आहे.
त्याचबरोबर आत्तापर्यंत एकूण आठच खेळाडूंनी ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे तो ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील फक्त ९ वाच खेळाडू असेल.
धोनीने २३ डिसेंबर २००४ ला त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने भारताकडून ९० कसोटी, ३१५ वनडे आणि ९१ टी२० सामने खेळले. तसेच त्याने आशिया संघाकडून ३ वनडे सामने खेळले आहेत. असे मिळून धोनीने आत्तापर्यंत ४९९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
सर्वाधिक सामन्यात नेतृत्व:
या ४९९ सामन्यांपैकी कॅप्टनकूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने कर्णधार म्हणून तब्बल ३३१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करण्याचा विश्वविक्रमही धोनीच्या नावावर आहे.
या यादीत आॅस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉन्टींग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३२४ आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व केले आहे.
क्रिकेटच्या तीनही प्रकारात असा कारनामा करणारा धोनी एकमेव खेळडू
आंतरराष्ट्रीय स्थरावर एमएस धोनी क्रिकेटच्या तीनही प्रकारात प्रत्येकी ९० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.
अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्थरावर दोन क्रिकेटच्या प्रकारात प्रत्येकी ९० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत पण क्रिकेटच्या तीनही प्रकारात आत्तापर्यंत एकाही खेळाडूला असा कारनामा करता आलेला नाही.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे क्रिकेटपटू:
६६४ सामने – सचिन तेंडूलकर
६५२ सामने -माहेला जयवर्धने
५९४ सामने -कुमार संगकारा
५८६ सामने -सनथ जयसुर्या
५६० सामने -रिकी पॉन्टींग
५२४ सामने -शाहिद आफ्रिदी
५१९ सामने -जॅक कॅलिस
५०९ सामने -राहुल द्रविड
४९९ सामने -एमएस धोनी
४९९ सामने -इंझमाम-उल-हक
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणारे क्रिकेटपटू:
३३१ सामने – एमएस धोनी
३२४ सामने – रिकी पॉन्टींग
३०३ सामने – स्टीफन फ्लेमिंग
२८६ सामने – ग्रॅमी स्मिथ
२७१ सामने – अॅलन बॉर्डर
महत्त्वाच्या बातम्या:
-असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!
-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक
-विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..