भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सातत्याने चर्चेत असतो. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतोय. पहिल्या दोन सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत कौतुक वसूल करून घेतलेय. असे असतानाच आता आणखी एक खास गोष्ट त्याच्याकडून घडली. धोनीने मागील आर्थिक वर्षात झारखंडमधील सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती होण्याचा पुन्हा एकदा मान मिळवला.
धोनीने अडीच वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतले आहे. असे असले तरी त्याची प्रसिद्धी तसूभरही कमी झालेली नाही. अजूनही त्याच्याकडे अनेक ब्रँडचे करार आहेत. अशातच आता त्याने मागील आर्थिक वर्षात झारखंडमधील सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती होण्याचा मान पुन्हा एकदा आपल्या नावे केला. धोनीने 2022-2023 या आर्थिक वर्षात तब्बल 38 कोटी इतका अतिरिक्त कर भरला. मागील वर्षी ही आकडा 38 कोटी इतकाच होता. धोनी जेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे तेव्हापासून तोच झारखंड मधील सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती ठरतोय.
आयकर विभागाला दिलेल्या माहितीनुसार धोनीच्या उत्पन्नामध्ये 30 टक्क्यांनी वाढ झालीये. धोनीची एकूण संपत्ती ही 150 ते 160 कोटींच्या घरात असू शकते. धोनी क्रिकेटपटू म्हणून केवळ सध्या चेन्नई सुपर किंग संघाकडूनच खेळतो. असे असले तरी त्याच्याकडे 15 पेक्षा जास्त मोठ्या कंपन्यांचे करार आहेत. या सर्वांसाठी तो ब्रँड अँबेसिडर म्हणून काम पाहतो. यासोबतच जवळपास 50 एकरांमध्ये तो रांची येथे ऑरगॅनिक शेती देखील करत आहे. या व्यतिरिक्त काही कंपन्यांमध्ये त्याची भागीदारी देखील दिसून येते.
(MS Dhoni Again Becomes Highest Tax Payer In Jharkhand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING । लवकरच श्रेयस अय्यरची मोठी शस्त्रक्रिया, आयपीएलसह महत्वाच्या सामन्यालाही मुकणार
आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट! महामारीच्या कचाट्यात अडकला भारतीय दिग्गज