---Advertisement---

टिंगल सुरु झाली तर! संकटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्जची मुंबई इंडियन्स घेतंय फिरकी?

---Advertisement---

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. हा मोसम यावेळी युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता यावर्षीचा आयपीएल हंगाम युएईला आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व संघ दुबईला पोहचले आहे. परंतु या दरम्यान खेळाडूंच्या सुरक्षिततेकडे सर्वांचे लक्ष आहे.

अशातच चेन्नई सुपर किंग्स संघातील १३ सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. या १३ जणांमध्ये दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचाही समावेश आहे. त्यातच सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू सुरेश रैनाने यावर्षीच्या आयपीएलमधून वैयक्तिक कारणाने माघार घेतली आहे.

अशातच सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गेल्या दोन दिवसांत पोस्टचा ओघ कमी झाला आहे. अगदी दिवसांत ६-७ ट्विट करणाऱ्या सीएसकेच्या अकाऊंटवरुन दोन दिवसांत केवळ रैनाबद्दलचे एक ट्विट करण्यात आले आहे.

अशातच आज दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आले आहेत. यानंतर या स्पर्धेतील एकमेकांचे कट्टर स्पर्धक समजल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी ‘सेफ्टी फर्स्ट अर्थात सुरक्षितता प्रथम’ असे ट्विट केले आहे. यात खेळाडू कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कशी काळजी घेतात याचे काही फोटो शेअर केले आहेत.

यावर व्यक्त होताना काही ट्विटरातींनी हा एक खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी मुंबई इंडियन्स चेन्नई फिरकी घेत असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/30NotOut/status/1299620581894008832

https://twitter.com/ishumsd07/status/1299625171020476421

https://twitter.com/ishumsd07/status/1299643223695003648

https://twitter.com/cricketfreak009/status/1299621996322385920

https://twitter.com/Bigil99/status/1299620751926915072

https://twitter.com/Viratholic3/status/1299621601122463744

या ट्विटला उत्तर देताना चेन्नईच्या अनेक चाहत्यांनी ऍडमिनला जबाबदार धरले आहे. मुंबई इंडियन्सचा सोशल मीडियाचा ऍडमिन चेन्नई सुपर किंग्जला टारगेट करत असल्याचे अनेक ट्विट चाहत्यांनी केले आहेत.

१९ सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात होत असून १० नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. सर्व सामने युएईमधील तीन शहरांत होणार असून मुंबई इंडियन्स गतविजेता असून चेन्नई गतउपविजेता संघ आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---