---Advertisement---

पुन्हा एकदा रंगला धोनी-मॉरीसनमध्ये मजेदार कलगीतुरा, पाहा धोनीचा हजरजबाबीपणा

On: शनिवार, मे 20, 2023 5:24 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (20 मे) पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेला चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकली. मात्र, नाणेफेकी वेळी पुन्हा एकदा समालोचक डॅनी मॉरीसन व धोनी यांच्या दरम्यान मजेदार संवाद झाला.

हंगामातील अखेरचा सामना खेळत असलेल्या चेन्नई व दिल्ली यांच्या दरम्यान नाणेफेक करण्याची जबाबदारी समालोचक डॅनी मॉरीसन यांच्यावर होती. धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतर या दोघांमध्ये नेहमीप्रमाणे एक मजेदार संवाद घडला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असल्याचा इशारा धोनी याने केला. त्यानंतर डॅनी यांनी म्हटले,

“समीकरण अत्यंत सोपे आहे. सामना जिंकल्यावर थेट प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरणार आहात.’

त्यावर धोनीने अजिबात वेळ न घेता म्हटले,

“आम्ही पहिल्या सामन्यापासूनच जिंकण्याचा प्रयत्न करतोय.” त्यावर दोघे खळखळून हसले.

धोनी पुढे म्हणाला, “आम्ही त्याच प्लेइंग इलेव्हनसोबत उतरत आहोत. ही एक चांगली इलेव्हन आहे आणि आम्हाला जास्त बदल करण्याची गरज नाही. हा दिवसाचा सामना आहे, त्यामुळे खेळपट्टी जसजशी पुढे जाईल तसतसा खेळ मंद होत जाईल.”

हा सामना जिंकून चेन्नईला दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन सामने मिळतील. धोनी कदाचित आपला अखेरचा हंगाम खेळत असल्याने सर्व खेळाडू त्याला विजयी भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. धोनीने आपण निवृत्त होत असल्याचे संकेत यापूर्वी दिले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

(MS Dhoni And Danny Morrison Funny Banter While Toss In IPL 2023 DCvCSK)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी एकटा बोर झालेलो…’, ख्रिस गेलने आपल्या खास क्लबमध्ये केले विराटचे स्वागत
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पृथ्वीबाबत सहाय्यक कोच वॉटसनचे खळबळजनक भाष्य; काय म्हणाला लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---