भारतीय क्रिकेट इतिहासातील एक काळा डाग म्हणून 2012 साली इंग्लंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका ओळखली जाते. या मालिकेमध्ये इंग्लंड संघाने सनसनाटी कामगिरी करत भारताचा 2-1 ने पराभव केला होता. या मालिकेतील पराभव तेव्हाच्या काळात अनेक भारतीय दिग्गजांना सहन झालेला नव्हता. त्याच दरम्यान तत्कालिन भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी व भारताचा सलामीवीर गौतम गंभीर यांच्यामधील वाद देखील पुढे आला होता.
सन 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेदरम्यान गंभीर व धोनी मध्ये वादाची ठिणगी पडली होती. तत्कालीन मीडिया रिपोर्टनुसार धोनीने गंभीरवर आरोप लावले होते की तो स्वार्थीपणे खेळतोय व संघातील वातावरण दूषित करतोय. धोनीचा आरोप होता की गंभीरने तळाच्या फलंदाजांसोबत भागीदारी करताना स्वतः जास्त चेंडू खेळण्याची आवश्यक होती. मात्र, गंभीरने तळातील फलंदाजांना स्ट्राईक दिली व त्यामुळे गंभीर स्वतः नाबाद राहिला पण संघ कमी संख्येवर बाद झाला.
धोनीच्या या खळबळजनक रिपोर्टमुळे तत्कालिन भारतीय क्रिकेटमध्ये वातावरण तापले होते. अनेक क्रिकेट पंडितांनी त्यावेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. दिवंगत क्रिकेट खेळाडू चेतन चौहान यांनी भारतीय संघाने वाद विसरून एकत्रितपणे खेळावे असा सल्ला दिला होता. चौहान म्हणाले होते की महेंद्रसिंग धोनी हा केवळ मैदानात कर्णधार नसून त्याने संघ व्यवस्थापन देखील चोख पार पाडावे.
माजी क्रिकेट खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांनी देखील तेव्हा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या मते श्रीनिवासन यांच्यामुळे महेंद्रसिंग धोनीला कर्णधार पदावर कायम ठेवण्यात आले होते. भारतीय संघाचे सलग पराभव होत असून देखील धोनीला कर्णधारपदावर कायम ठेवण्यात आल्यामुळे अनेकांना त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला होता. या मालिकेनंतर गौतम गंभीरची क्रिकेट कारकीर्द विस्कळीत झाली होती व लवकरच त्याला संघाबाहेर काढण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
थोडेथोडके नाही तब्बल १०७ वर्षांनी इंग्लंड संघाने केला ‘तो’ कारनामा
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी पंत धोनीच्या भेटीला, साक्षीने शेअर केले फोटो
आयएसएल २०२०-२१ : केरला ब्लास्टर्स आणि जमशेदपूर एफसी यांच्यात रंगणार लढत; टॉप ४ मध्ये येण्यासाठी चुरस